‘तुला पाहते रे’ ही वय विसरायला लावणारी जगावेगळी प्रेम कहाणी झी मराठी वाहिनी प्रेक्षकांसाठी घेऊन आली. अवघ्या काही दिवसांतच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. यामध्ये अभिनेता सुबोध भावे आणि नवोदित अभिनेत्री गायत्री दातार मुख्य भूमिका साकारत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मूळची पुण्याची असलेल्या गायत्रीने या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. करिअरच्या या पहिल्याच संधीचं तिनं सोनं केलं आहे असं म्हणायला हरकत नाही. मालिकेत ती साकारणारी ईशा निमकर मध्यमवर्गीय कुटुंबात राहणारी अत्यंत साधी मुलगी आहे. तिला जगातील छक्के पंजे कळत नाही. पण खऱ्या आयुष्यात गायत्री खूप धाडसी आहे. तिला फिरण्याची आणि ट्रेकिंगची खूप आवड आहे.

वाचा : आता थायलंडमध्येही ‘यळकोट यळकोट जय मल्हार’

लेह लडाखची भटकंती, मनालीमध्ये ट्रेकिंग, कोयना नदीत रिव्हर राफ्टिंग असे बरेच फोटो गायत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मालिकेतली ईशा जरी सतत गोंधळलेली आणि संभ्रमावस्थेत दिसत असली तरी गायत्री खऱ्या आयुष्यात स्पष्टवक्ती आहे. गायत्रीने अत्यंत कमी वेळात प्रेक्षकांच्या हृदयात स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेमुळे तिच्यावर प्रेमाचा वर्षाव होत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Few interesting things about gayatri datar tula pahate re marathi serial actress
First published on: 07-10-2018 at 15:41 IST