scorecardresearch

Premium

आदित्य पंचोलीवर निर्मात्यानं केला मारहाणीचा आरोप, वाचा काय आहे नेमकं प्रकरण

अभिनेता आदित्य पंचोलीवर एका निर्मात्यानं मारहाण केल्याचा आरोप केला आहे.

sam fernandes, aditya pancholi, aditya pancholi controversy, sam fernandes accuses aditya pancholi, आदित्य पंचोली, सॅम फर्नांडिस, आदित्य पंचोली वाद, सूरज पंचोली
अभिनेता आदित्य पंचोली त्याच्या अभिनय कारकिर्दीपेक्षा वादग्रस्त कारणांमुळेच सर्वाधिक चर्चेत राहिला आहे.

अभिनेता आदित्य पंचोली त्याच्या अभिनय कारकिर्दीपेक्षा वादग्रस्त कारणांमुळेच सर्वाधिक चर्चेत राहिला आहे. आता पुन्हा एकदा त्याचं नाव नव्या वादामुळे चर्चेत आलं आहे. एक प्रसिद्ध निर्मात्यानं आदित्य पंचोलीवर शिवीगाळ करणे, धमकी देणे आणि मारहाण केल्याचा आरोप केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार या निर्मात्यानं आदित्य पंचोलीच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रारही केली आहे.

वादग्रस्त कारणांनी नेहमीच चर्चेत राहणारा अभिनेता आदित्य पंचोल सध्या निर्माता सॅम फर्नांडिसनं केलेल्या मारहाण आणि धमकी देण्याच्या आरोपामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. त्यानं आदित्य पंचोलीच्या विरोधात जुहू पोलीस ठाण्यात हॉटेलमध्ये शिवीगाळ करणे, धमकी देणे आणि मारहाण केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे.

Kangana Ranaut
चित्रपटसृष्टीने आपल्याला अनेकदा अपमानित केले, कंगना राणावतचा न्यायालयात दावा
protestors demand arrest of tmc sheikh shahjahan in west bengal over sexual abuse case
अग्रलेख: वाईटांचा वसंतोत्सव!
Full CCTV footage of Mahesh Gaikwad attack video goes viral
कल्याण : महेश गायकवाड हल्ल्यातील संपूर्ण सीसीटीव्ही चित्रण प्रसारित
law effectively implement in solapur says police chief
सोलापुरात कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करू – नवे पोलीस आयुक्त राजकुमार यांची ग्वाही

एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी सांगितलं की, आदित्य पंचोलीनंही निर्माता सॅम फर्नांडिसच्या विरोधात शिवीगाळ केल्याची आणि धमकी दिल्याची तक्रार दाखल केली आहे. मात्र काही मीडिया रिपोर्ट्सनुसार आदित्य पंचोली मागच्या काही काळापासून निर्माता सॅम फर्नांडिसवर त्याच्या आगामी चित्रपटात आपला मुलगा सूरज पंचोलीला कास्ट करण्यासाठी दबाव टाकत होता.

दरम्यान २०१९ मध्ये सॅम फर्नांडिसनं एका चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली होती. ज्यात आदित्य पंचोलीचा मुलगा सूरजची मुख्य भूमिका होती. या चित्रपटाचं १२ दिवसांचं शूटिंग पूर्ण झालं होतं. करोनाच्या काळात देशात लॉकडाऊन झाल्यानंतर या चित्रपटाचं शूटिंग बंद झालं. त्यानंतर अलिकडेच म्हणजे २७ जानेवारीला सॅम या संदर्भात चर्चा करण्यासाठी आदित्य पंचोलीला भेटण्यासाठी जुहू येथील सन अँड सन हॉटेलमध्ये गेला होता. पण त्यावेळी आदित्य नशेत होता आणि त्यानं आपल्याला मुलगा सूरजसोबत चित्रपट बनवण्यासाठी धमकी दिल्याचा आरोप सॅमनं केला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Filmmaker sam fernandes accuses aditya pancholi to abuse and pressurize him mrj

First published on: 10-02-2022 at 09:35 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×