पाहाः कंगना, इमरान हाश्मीच्या ‘उंगली’चा मोशन पोस्टर

बॉलीवूड चित्रपट निर्माता, दिग्दर्शक करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या ‘उंगली’ चित्रपटाचा मोशन पोस्टर प्रदर्शित झाला आहे.

बॉलीवूड चित्रपट निर्माता, दिग्दर्शक करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या ‘उंगली’ चित्रपटाचा मोशन पोस्टर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात इमरान हाश्मी, कंगना रणावत, रणदीप हुड्डा, निल भूपालम, अंगद बेदी आणि संजय दत्त यांच्या भूमिका आहेत.
उंगलीच्या मोशन पोस्टरमध्ये कंगना, इमरान आणि रणदीप हे हातात काठी, हेडलाइट आणि हॅण्डी कॅमरा घेऊन धावताना दिसतात. या चित्रपटातील कलाकारांची यादी मोठी असल्यामुळे या सर्वांच्या एकत्र तारखा घेऊन चित्रीकरण करण्यात मोठा अडथळा निर्माण येत होता. मात्र, या सर्वांवर गाणे चित्रीत करण्यात आल्यामुळे चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्याची शक्यता बाळगायला हरकत नाही. हा चित्रपट २८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: First look unveiled kangana ranaut emraan hashmis ungli

ताज्या बातम्या