आमचे गिरगावकर मनमोहन देसाई यांच्या स्वच्छंदी मुलाखतीचा काधीही योग आला की त्यांचे म्हणणे असे की, मी दादा कोंडके यांचा चाहता आहे. त्याच मनजींच्या हस्ते दादा कोंडके यांनी ‘बोट लाविन तेथे गुदगुल्या’ या चित्रपटाची ज्युबिलीची ट्रॉफी स्वीकारली त्या क्षणाचे हे छायाचित्र. या दोघांची खासियत म्हणजे, त्यांच्या चित्रपटाना समिक्षक झोडपत, पण प्रेक्षक डोक्यावर घेत. नॉन्सेस सिनेमा काढायला जास्त सेन्स लागतो याचे भान त्यांनी कधीही सोडले नाही. त्यांचाच सिनेमा जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहचला हे अजिबात नाकारता येणार नाही. पूर्वी या दोघांच्याही भेटीचे योग अनेकदा येत तेव्हा त्यांच्या बोलण्यात जनसामान्यांना आपण खूप आनंद द्यायला हवा ही भावना दिसे.
संग्रहित लेख, दिनांक 30th Oct 2015 रोजी प्रकाशित
फ्लॅशबॅक : मनमोहन देसाई आणि दादा कोंडके
मनमोहन देसाई आणि दादा कोंडकेंच्या चित्रपटांना समिक्षक झोडपत, पण प्रेक्षक डोक्यावर घेत.
Written by दीपक मराठे

First published on: 30-10-2015 at 01:05 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flashback manmohan desai and dada kondke