सेन्सॉरच्या कैचीत सापडलेल्या चित्रपटांच्या कथा व्यथा खूप. आर. के. नय्यर निर्मित व मदन जोशी दिग्दर्शित ‘पती परमेश्वर’ (१९९०) या चित्रपटाचे उदाहरण द्यायलाच हवे. या चित्रपटाची थीम थोडक्यात अशी; सुखाचा संसार सुरु असतानाच पती ( शेखर सुमन) एका तवायफच्या  (डिंपल खन्ना) प्रेमात वेडापिसा झाल्याने त्याची पत्नी ( सुधाचंद्रन) व्यथित होते, तो दारुच्याही आहारी जातो. त्याला आपलासा करण्याचे या परंपरावादी स्त्रीचे प्रयत्न व देवपूजा इत्यादी गोष्टी म्हणजे हा चित्रपट होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निर्माते आर. के. नय्यर म्हणजे अभिनेत्री साधनाचे पती. त्यांना ‘अनिता’, ‘गीता मेरा नाम’, ‘कत्ल’ इत्यादी चित्रपटांच्या निर्मितीचा अनुभव. तर मदन जोशी संवाद लेखनाकडून दिग्दर्शनाकडे वळलेले. हा चित्रपट निर्मितीवस्थेत थोडासा रखडला. कारण शेखर सुमन त्याच वेळेस ‘अनुभव’ ( पद्मिनी कोल्हापूरेसोबत), ‘उत्सव’ ( रेखासोबत) अशा काही चित्रपटांतून बिझी. तर डिंपलकडे ‘राम लखन’,  ‘काश’ असे अनेक चित्रपट. अशा वेळेस दोघांच्याही तारखा मिळवणे व जुळवून चित्रीकरण आखणे अवघड काम असते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flashback pati parmeshwar stuck in censorship
First published on: 03-02-2017 at 01:05 IST