नुकताच ‘मिस कोहिमा ब्यूटी पीजेंट २०१९’ ही सौंदर्य स्पर्धा नागालँड येथे पार पडली. सध्या सोशल मीडियावर या स्पर्धेतील एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या स्पर्धेदरम्यान मॉडेल्सला प्रश्न विचारण्यात आले होते. स्पर्धेतील सेकंड रनरअप वीक्यून्यो साचू (Vikuonuo Sachu)ला भारताचे पंतप्रदान नरेंद्र मोदी यांच्या संबंधीत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर वीक्यून्योने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वीक्यून्योला प्रश्न आणि उत्तर फेरीमध्ये परिक्षकांनी ‘जर तुला पीएम मोदी यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली तर तु त्यांच्याशी काय बोलशील?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर वीक्यून्योने थोडा विचार केला आणि म्हणाली ‘जर मला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली तर मी त्यांना सांगेन की गायींवर लक्ष देण्यापेक्षा भारतातील महिलांच्या परिस्थीतीकडे बघा.’ तिचे हे उत्तर ऐकून सर्वत्र हास्याची लाट पसरली. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

५ ऑक्टोबर रोजी ‘मिस कोहिमा ब्यूटी पीजेंट २०१९’ ही सौंदर्य स्पर्धा पार पडली आहे. या स्पर्धेत अनेक सुंदर मॉडेल्सने सहभाग घेतला होता. वीक्यून्यो ही स्पर्धेची सेकंड रनरअप ठरली असून ती केवळ १८ वर्षांची आहे. या स्पर्धेत २३ वर्षांची Khrienuo Liezietsu ने मिस कोहिमाचा किताब पटकावला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Focus on women instead of cows miss kohima contestants message for pm modi avb
First published on: 16-10-2019 at 11:02 IST