नागरी सेवा परीक्षेत (UPSC) ९३ वा क्रमांक पटकावून चर्चेत आलेली प्रसिद्ध मॉडेल ऐश्वर्या श्योराण सध्या फेक इन्स्टाग्राम अकाउंट्समुळे त्रस्त आहे. तिने या फेक अकाउंट्स विरोधात कुलाबा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. सध्या सायबर पोलीस विभागामार्फत या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अवश्य पाहा – WWE मध्ये नोकर कपात; या सुपरस्टार्सला दाखवला बाहेरचा रस्ता

ऐश्वर्या श्योराण एक प्रसिद्ध मॉडेल आहे. २०१६मध्ये फेमिना मिस इंडिया स्पर्धेत फाइनलिस्ट ठरलेल्या या सौंदर्यवतीने UPSC परिक्षेत बाजी मारुन सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. या कामगिरीसाठी सोशल मीडियाद्वारे तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला गेला. पण लक्षवेधी बाब म्हणजे तिचं हे कौतुक काही फेक अकाउंट्सवर केलं जात आहे. ऐश्वर्या चर्चेत येताच जवळपास २० खोटी इन्स्टाग्राम अकाउंट्स तिच्या नावाने सुरु करण्यात आली. या अकाउंटवर तिचे फोटो आणि व्हिडीओजदेखील पोस्ट करण्यात आले. या अकाउंट्सला खरं मानून काही तासांत हजारो चाहत्यांनी त्यांना फॉलो करण्यास सुरुवात केली. या खोट्या अकाउंट्सला बंद करण्यासाठी ऐश्वर्याने आता पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे.

Justice For Sushant: अमेरिकेतील चाहत्यांचा सुशांतच्या कुटुंबीयांना पाठिंबा

UPSC परिक्षेत महाराष्ट्रातून अभिषेक सराफ पहिला आला आहे. तर जतिन किशोर दुसऱ्या क्रमांकावर असून प्रतिभा वर्मा तिसऱ्या आणि महिला उमेदवारांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची अधिकृत यादी यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आली आहे. विविध नागरी सेवा परीक्षा दिलेल्या एकूण ८२९ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.

कसा बघाल युपीएससीचा निकाल

  1. UPSC चा निकाल पाहण्यासाठी http://www.upsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जा.
  2. Civil Services Examination, 2019 या लिंकवर क्लिक करा.
  3. या पीडीएफमध्ये तुमचे नाव आणि रजिस्ट्रेशन नंबर पाहा
  4. पीडीएफ फाइल डाउनलोड करून प्रिंटही काढू शकता.
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former miss india finalist aishwarya sheoran complaint over fake profiles mppg
First published on: 09-08-2020 at 12:57 IST