ग्राहकांना देण्यात येणाऱ्या व्हिडीओ ऑन डिमांडमधील नवीन संधीवर प्रकाशझोत टाकणारे केबल टीव्हीचालकांसाठी विशेष चर्चासत्र जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड येथील मातोश्री स्पोर्ट््स, क्लब येथे रविवार, २४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता होणार असून केबलचालकांना विनामूल्य प्रवेश आहे. नवीन डिजिटायजेशनमध्ये केबल ऑपरेटर्सना व्हिडीओ ऑन डिमांड सेवा पुरविणे शक्य झाले आहे. विविध चित्रपट तसेच मालिका नव्या माध्यमातून दाखविता येतील. या संधीची ओळख करून देण्याच्या उद्दिष्टाने केबल टीव्हीचालकांसाठी हे चर्चासत्र होणार आहे. केबल ऑपरेटर्स असोसिएनशनचे अध्यक्ष अनिल परब म्हणाले की, याअद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून आपली उत्पादने आणि सेवा मूल्यवर्धन करणे २५०० केबलचालकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. ड्रीमस्टार एण्टरटेन्मेंटने या चर्चासत्राचे आयोजन केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th Aug 2014 रोजी प्रकाशित
केबलचालकांसाठी रविवारी विनामूल्य चर्चासत्र
ग्राहकांना देण्यात येणाऱ्या व्हिडीओ ऑन डिमांडमधील नवीन संधीवर प्रकाशझोत टाकणारे केबल टीव्हीचालकांसाठी विशेष चर्चासत्र जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड येथील मातोश्री स्पोर्ट््स, क्लब येथे रविवार, २४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता होणार असून केबलचालकांना विनामूल्य प्रवेश आहे.
First published on: 24-08-2014 at 03:05 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Free discussion for cable operators on sunday