‘फ्री हिट दणका’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

‘या’ दिवशी येणार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

भारत हा क्रिकेटप्रेमींचा देश. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना क्रिकेटचे वेड आहे. याच क्रिकेटवर आधारित ‘फ्री हिट दणका’ हा चित्रपट १७ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर नुकताच प्रदर्शित झाला असून यात ‘फँड्री’ फेम सोमनाथ अवघडे दमदार फटकेबाजी करताना दिसत आहे.

ग्रामीण कथेवर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन सुनील मगरे यांनी केले आहे. क्रिकेटमधील संघर्ष, चुरस, उत्सुकता, डावपेच तसेच ग्रामीण भागातील रांगडेपणा, ग्रामीण भाषेतील लहेजा हे सर्व प्रेक्षकांना या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची कथा आणि पटकथा सुनील मगरे यांचीच असून, लेखन आणि संवाद संजय नवगीरे यांचे आहेत. आकाश अलका बापू ठोंबरे, मेघनाथ गुरुनाथ सोरखडे आणि सुनिल मगरे चित्रपटाचे निर्माते आहेत तर नितीन बापू खरात, सुधाकर लोखंडे यांनी सहनिर्मात्यांची धुरा सांभाळली आहे.

उघडेवाडी आणि निगडेवाडी या दोन गावातील नेत्यांमधील वैमनस्यातून क्रिकेटच्या मॅचचे आयोजन केले जाते. या मॅचचा विजेता नक्की कोण ठरतो? या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये नायकाच्या प्रेमाचा बळी जातो का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी प्रेक्षकांना या चित्रपटाची वाट पाहावी लागणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरमुळे प्रेक्षकांमध्ये निर्माण झालेली उत्सुकता चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यामुळे अधिकच वाढली आहे. एसजीएम फिल्म्स प्रस्तुत ‘फ्री हिट दणका’ या चित्रपटात अपूर्वा एस. हिच्यासह ‘सैराट’ चित्रपटातील सुपरहिट जोडी अरबाज (सल्या) आणि तानाजी (लंगड्या), सुरेश विश्वकर्मा, अनिल नगरकर, गणेश देशमुख यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Free hit danka movie teaser is out avb

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या