नव्वदीच्या दशकातील लोकप्रिय अमेरिकन टीव्ही शो ‘फ्रेंड्स’मध्ये चँडलरची भूमिका साकारणारे अभिनेते मॅथ्यू पेरी यांचे निधन झाले आहे. त्यांचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी आढळला. वयाच्या ५४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लास वेगास येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांचा मृतदेह घरातील हॉट टबमध्ये बुडालेल्या अवस्थेत आढळून आला आहे. मात्र मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला असून सोशल मिडियावरून याबद्दल सर्वजण शोक व्यक्त करत आहेत.

चँडलर या पात्राचे भारतातसुद्धा कित्येक चाहते आहेत आणि आज त्या सगळ्यांवर आणि या टीव्ही सीरिजच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. ‘सार्काजम’ आणि शाब्दिक कोट्या करण्यात माहिर असलेल्या चँडलरने सगळ्यांना प्रचंड हसवलं. पण खऱ्या आयुष्यात मॅथ्यू यांना बऱ्याच दुर्दैवी आणि दुःखद घटनांचा सामना करावा लागला. ‘Friends, Lovers, and the Big Terrible Thing’ या आपल्या पुस्तकात त्यांनी त्यांचं दारूचं व्यसन आणि ड्रग्जचं व्यसन याबद्दल भाष्य केलं आहे.

vaibhav anil kale death former army officer col vaibhav anil kale killed in gaza
अक्षम्य संकेतभंगाचे बळी
women in war
पराकोटीचा छळ, जबरदस्तीने विवाह, बलात्कार, मानवी तस्करी अन्…; महिलांचा युद्धात ‘असा’ जातो बळी
Why Israel compassion for Hamas war victims cost lives
युद्धग्रस्तांबाबतची सहृदयताच जीवावर बेतली, असे का व्हावे?
Husband wife dispute, Husband dispute Over Over Cold Dinner, Husband attempt Suicide, Husband attempt Suicide in Nagpur, Nagpur police,
बायकोने दिली थंड भाजी, नवऱ्याने घेतला आत्महत्येचा निर्णय; पोलिसांच्या सतर्कतेमुळे नवऱ्याचे वाचले प्राण
Punjab Sacrilege Case
श्री गुरू ग्रंथ साहिबच्या प्रतीचा अवमान केल्याच्या संशयावरून १९ वर्षीय तरुणाची हत्या, पंजाबमधील घटना
Nagpur, Kunal, murde, alcohol,
नागपूर : मित्रांनी दारूच्या वादातून केली कुणालची हत्या.. वानाडोंगरीतील घटनेचा अखेर उलगडा
Virat Kohli's reaction on strike rate
विराट कोहलीने स्ट्राईक रेटवरुन टीका करणाऱ्यांना फटकारले; म्हणाला, ‘जे लोक दुसऱ्यावर टीका करतात त्यांनी स्वत:…’
iran women hijab
हिजाब न घातल्याने महिलांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, इराणमध्ये नक्की काय घडत आहे?

आणखी वाचा : “Friends संपल्यावर दुःख झालं नाही, औषधाने मी..”, मॅथ्यू पेरी उर्फ चॅन्डलरने सांगितला होता ‘तो’ अनुभव

आपल्या आई-वडिलांना वेगळं होताना पाहून मॅथ्यू आणखीनच दुःखी झाले व अगदी लहान वयातच म्हणजे १४ व्या वर्षीच त्यांनी दारूचे सेवन करण्यास सुरुवात केली. वयाच्या १८ व्या वर्षी ते नियमित दारू पिणारे बनल्याचंही त्यांनी या पुस्तकात कबूल केलं आहे. याबरोबरच मॅथ्यू यांना ड्रग्जचंही व्यसन होतं. त्याविषयी सांगताना मॅथ्यू म्हणाले, “मी त्यावेळी विकोडीनच्या ५५ गोळ्या दिवसाला घ्यायचो. मला कुठे थांबायचं हे कळत नव्हतं. पोलिस माझ्या घरी येऊन मला तुरुंगात टाकायची धमकी देऊन जायचे तेव्हा मी त्यासाठीही तयार असायचो, पण मी त्या ड्रग्जशिवाय राहू शकत नव्हतो, आणि कालांतराने ही परिस्थिती आणखीनच हाताबाहेर गेली.”

‘फ्रेंड्स’च्या चित्रीकरणादरम्यानही मॅथ्यू हे बऱ्याचदा दारूच्या नशेत असायचे हे त्यावेळच्या सहकलाकारांनीही सांगितलं होतं. सीरिजमधील इतर कलाकारांनीही त्यांना या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी बरीच मदत केली होती. ‘पीपल मॅगजीन’च्या एका मुलाखतीमध्ये मॅथ्यू यांनी ही गोष्टदेखील कबूल केली की त्यांना वर्षातून किमान १५ वेळा व्यसनमुक्तीसाठीच्या सुधारगृहात जावं लागत असे.

friends
फोटो सौजन्य : रॉयटर्स

इतकंच नव्हे २०१८ मध्ये न्यूमोनिया, कोलोन इन्फेक्शन आणि अन्य काही गोष्टींमुळे मॅथ्यू यांना रुग्णालायात दाखल केलं गेलं होतं. त्यावेळी ते चक्क दोन आठवडे कोमात होते आणि त्यान लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. ‘चार्ल्स इन चार्ज’ या चित्रपटातून मॅथ्यू पेरी यांनी बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली. पण त्यांना खरी प्रसिद्धी टीव्ही मालिका ‘फ्रेंड्स’मधून मिळाली. ही मालिका २२ सप्टेंबर १९९४ रोजी सुरू झाली आणि ६ मे २००४ रोजी संपली. ‘फ्रेंड्स’चे दहा सीझन आले. तर त्यानंतर त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमधून काम केलं आहे.