लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे मंडळाने विविध उत्पन्न गटातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमधील तब्बल ४७७७ घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. मात्र, नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने म्हाडाने नागरिकांना घरांसाठी अर्ज करण्याला ३० मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. अर्ज करण्यासाठी शेवटचे नऊ दिवस शिल्लक राहीले आहेत.
     
मार्च महिन्यात म्हाडा पुणे मंडळाने सोडत जाहीर केली. ८ मार्चपासून या सोडतीमधील घरांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात करण्यात आली. ऑनलाइन अर्ज नोंदणीची मुदत ८ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत होती. मात्र, या कालावधीत केवळ १६ हजार अर्ज प्राप्त झाले. त्यामुळे अर्ज करण्यासाठी ३० मे रोजी रात्री ११:५९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांची संख्या १०० ने वाढविण्यात आली.

आणखी वाचा-“गरिबांचा एक अन् श्रीमंतांचा एक असे दोन…”, पुण्यातील अपघातावरून राहुल गांधींची उद्विग्न प्रतिक्रिया

Heavy rain throughout the day in Yavatmal district
यवतमाळ जिल्ह्यातील २४ मंडळांत अतिवृष्टी, संततधार सुरूच
Schools in Mahad Poladpur Karjat in Raigad district will have holiday tomorrow
रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर, कर्जत येथील शाळांना उद्या सुट्टी
Bulls in Satara District for Bendur Festival Bulls available in large quantities for sale in Satara District
सातारा जिल्ह्यात बेंदूर बाजार सजला
municipal corporation approved fund for road work
कोल्हापुरातील १०० कोटी रस्ते कामातील सावळा गोंधळ सुरूच
five killed in lightning strikes in vidarbha
वज्राघाताने विदर्भात पाच मृत्युमुखी; भंडारा, नागपूर जिल्ह्यांतील घटना
Additional bus service from district to Pandharpur on the occasion of Ashadhi nashik
आषाढीनिमित्त पंढरपूरसाठी जिल्ह्यातून जादा बससेवा; प्रत्येक आगारातून २० अधिकच्या बस
buldhana , rain
बुलढाणा जिल्ह्यातील १५ महसूल मंडळांत अतिवृष्टी; लाखो हेक्टरवरील पेरण्या धोक्यात
Buldhana, Collapse, rain, car,
बुलढाणा : जिल्ह्यात कोसळधार! १६ मंडळात अतिवृष्टी; पुरात कार वाहून गेली…

म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी अर्जदारांनी प्रथम http://www.mhada.gov.in किंवा https://mhada.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, तर ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावरील योजनांच्या सदनिकांसाठी lottery.mhada.gov.in या संकतेस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन म्हाडा पुणे मंडळाकडून करण्यात आले.

सोडतीचा तपशील योजना आणि सदनिका पुढीलप्रमाणे

  • म्हाडा योजनेंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य – २४१६
  • म्हाडाच्या विविध योजना – १८
  • म्हाडा पंतप्रधान आवास (पीएमएवाय) योजना – ५९
  • पंतप्रधान आवास (पीएमएवाय) खासगी भागीदारी योजना (पीपीपी) – ९७८
  • २० टक्के योजना पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड १४०६
    एकूण ४८७७ सदनिका