‘बाहुबली’ चित्रपट आला आणि तो रातोरात सुपरस्टार झाला. अर्थात एका रात्रीत लोकप्रियतेचं शिखर गाठणारा अभिनेता म्हणजे प्रभास. मुळात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत तुफान लोकप्रिय असलेला हा अभिनेता बाहुबलीमुळे पार सातासमुद्रापार लोकप्रिय झाला. त्यामुळे याचे आज असंख्य चाहते आहेत. विशेष म्हणजे प्रभास या नावाने लोकप्रिय असलेल्या या अभिनेत्याचं खरं नाव फार कमी जणांना माहित आहे.

काही काळापूर्वी एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात हजेरी लावलेल्या प्रभासने त्याचं पूर्ण नाव सांगितल्याचं पाहायला मिळालं. त्यानुसार, प्रभासचं पूर्ण नाव हे ‘व्यंकट सत्यनारायण प्रभास राजू उप्पालपती’ असं आहे.

आणखी वाचा- Birthday Special : जाणून घ्या प्रभासच्या एकूण संपत्ती विषयी

दरम्यान, प्रभास हा कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता असून त्याने बाहुबली, साहो या चित्रपटांव्यतिरिक्त अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.