‘डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स’ हा लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शो आहे. २७ जुलै पासून प्रेक्षकांना हा शो झी मराठीवर पाहता येणार आहे. या कार्यक्रमासाठी चिंचि चेटकीण महाराष्ट्रातून काही खास लिटिल मास्टर्स शोधून काढतेय. नुकतंच प्रेक्षकांना कळलं की या कार्यक्रमात परिक्षकाची भूमिका गश्मीर महाजनी साकारणार आहे. पण त्याच्या जोडीला अजून एक हरहुन्नरी अभिनेत्री परिक्षकाची भूमिकेत आपल्याला दिसणार आहे.

आणखी वाचा : “बाई, बूब्स आणि ब्रा’ पोस्टला आज वर्ष…”, हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत

Sanyukta Maharashtra movie
‘संयुक्त महाराष्ट्र’ चळवळीचा लढा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार, नवीन मराठी चित्रपटाची घोषणा, पोस्टरही प्रदर्शित
Prajakta mali namrata sambherao and Maharashtrachi Hasyajatra Women dance On Nach Ga Ghuma Song
Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील अभिनेत्रींचा ‘नाच गं घुमा’ चित्रपटाच्या टीमबरोबर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
marathi actor Makarand Anaspure appeared in the look of CM Eknath Shinde in the movie Juna Furniture
‘जुनं फर्निचर’ चित्रपटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या लूकमध्ये झळकले ‘हे’ प्रसिद्ध अभिनेते, पाहा फोटो
cannes film festival, FTII, short film,
प्रतिष्ठित कान चित्रपट महोत्सवात पुण्याच्या एफटीआयआयचा लघुपट

सगळ्यांची लाडकी आणि अप्सरा अशी ओळख असणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी दुसरी परिक्षक असणार आहे. सोनाली ही एक उत्तम डान्सर देखील आहे. या कार्यक्रमातील आपल्या परिक्षकाच्या भूमिकेबद्दल बोलताना सोनाली म्हणाली, “डान्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमाच्या परिक्षकाची भूमिका निभावण्याची जबाबदारी मला मिळाली आहे आणि याचा मला आनंद आहे. झी मराठी आणि डान्स रिअॅलिटी शो सोबत माझं नातं खूप आधीपासून आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एक डान्स रिअॅलिटी शो तो पण झी मराठीवर करताना मला खूप आनंद होतोय.”

आणखी वाचा : राजकारणातील या जय-वीरूच्या जोडीला ओळखलं का? भरत दाभोळकरांच्या पोस्टची चर्चा

आणखी वाचा : अर्जुन कपूरची बहिण अंशुलाने कॅमेऱ्यासमोर काढून दाखवली ब्रा; प्रियांका चोप्रा, म्हणाली…

पुढे सोनाली म्हणाली, “त्याचसोबतच या कार्यक्रमात लहान स्पर्धक असणार आहेत. त्यामुळे मी खूप उत्सुक आहे कारण आताची पिढी खूपच जास्त टॅलेंटेड आहे. त्यामुळे त्यांचं परिक्षण करणं हे आम्हाला सोपं जाईल असं मला अजिबात वाटत नाही. हा कार्यक्रम खूपच रंजक असणार आहे कारण याचा फॉरमॅट देखील थोडा वेगळा आहे. त्यामुळे मी या कार्यक्रमासाठी खूप उत्सुक आहे.”