गौहर खान ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मादक फोटो आणि व्हिडीओजमुळे चर्चेत राहाणारी गौहर सध्या आपल्या लग्नामुळे चर्चेत आहे. तिने अभिनेता जैद दरबारसोबत लग्न करण्याची घोषणा केली. अलिकडेच तिने आपल्या प्रीवेडिंग ग्लॅमरस फोटोशूटनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. या फोटोंवर गौहरचा एक्स बॉयफ्रेंड कुशल टंडननं प्रतिक्रिया दिली आहे. जर तिनं लग्नाला बोलावलं तर मी नक्की जाईन असं तो म्हणाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अवश्य पाहा – ‘वंडर वुमन’चा ओपनिंग सीन पाहिलात का?; १३ वर्षीय अभिनेत्रीचे स्टंट पाहून तोंडात बोटे घालाल

गौहर आणि कुशल कधीकाळी एकमेकांना डेट करत होते. २०१३ साली बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यानंतर त्यांनी लग्नाची घेषणा देखील केली पण अंतर्गत मतभेदांमुळे त्यांचं ब्रेकअप झालं.

अवश्य पाहा – ड्रग्जवरुन ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीचं खुलं आव्हान; सिद्ध करा अन्…

अलिकडेच ई टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत कुशालनं गैहरसोबतच्या नात्यावर भाष्य केलं. तो म्हणाला, “कितीही प्रयत्न केला तरी काही नाती दिर्घकाळ टीकत नाहीत. आमच्या बाबतीतही तेच घडले अन् आमचं ब्रेकअप झालं. आम्ही एकमेकांपासून वेगळे झालो असलो तरी देखील आमच्यात मैत्रीचे संबंध आहेत. ती लग्न करतेय हे पाहून मला खूप आनंद झाला. जर तिने मला लग्नाला बोलावलं, अन् त्यावेळी माझ्याकडे कुठलंही काम नसेल तर मी नक्की जाऊन तिला शुभेच्छा देईन.” कुशलच्या या वक्तव्यावर गौहरने अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gauahar khan ex bf kushal tandon on her wedding mppg
First published on: 18-12-2020 at 12:29 IST