Gold Trailer : अभिनेता अक्षय कुमारच्या बहुचर्चित ‘गोल्ड’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. देशाच्या इतिहासातील एका महत्त्वपूर्ण प्रसंगावर हा चित्रपट भाष्य करतो. हॉकी या खेळात स्वतंत्र भारतासाठी सुवर्ण पदक जिंकणं हेच स्वप्न तपन दासचं असतं आणि या स्वप्नासाठी तो कशाप्रकारे एक- एक खेळाडूला एकत्र आणतो, हे या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खेळाच्या पार्श्वभूमीवर देशप्रेमाची किनार असणारं कथानक ‘गोल्ड’ या चित्रपटातून साकारण्यात आलं आहे. यामध्ये अक्षय तपन दास ही भूमिका साकारत आहे. स्वतंत्र भारतासाठी हॉकी खेळण्याचा स्वप्न पाहणारा तपन दास हॉकी टीमचा सहाय्यक व्यवस्थापक असतो.

रिमा कागती दिग्दर्शित ‘गोल्ड’ची निर्मिती एक्सेल एण्टरटेनमेन्ट करत आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९४८ साली लंडनमध्ये झालेल्या १४व्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये देशाला पहिले सुवर्ण पदक मिळाले होते, त्यावर हा चित्रपट आधारित आहे. हा चित्रपट कोणत्याही व्यक्तिरेखेवर आधारित नसून १९३३-४८ या काळादरम्यान भारतात हॉकीची जी परिस्थिती होती त्यावर यामध्ये भाष्य केलं गेलं आहे असं निर्माते रितेश सिधवानी यांनी स्पष्ट केलं आहे.

वाचा : ३०८ मुलींवर छाप पाडण्यासाठी संजय दत्तनं वापरली ही युक्ती

अक्षय कुमारसोबतच यामध्ये मौनी रॉय, कुणाल कपूर, अमित साध, विनीत सिंग, सनी कौशल आणि निकीता दत्ता यांच्याही भूमिका आहेत.  १५ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold trailer akshay kumar period film akshay kumar dreams of winning an olympic gold medal for india
First published on: 25-06-2018 at 12:17 IST