श्रावण महिना नवविवाहितांसाठी खूप आनंदाचा असतो. या महिन्यात मंगळगौर, हळदी-कुंकवासारखे कार्यक्रम होतात. त्या निमित्तानं स्त्रियांना नटायला मिळतं. स्टार प्रवाह वाहिनीच्या ‘गोठ’ या मालिकेत प्रेक्षकांना राधाची पहिली मंगळागौर पहायला मिळणार आहे. मात्र, या मंगळागौरीतच राधाच्या हाती रहस्यमय ‘गोठ’ लागणार आहे.

वाचा : कोणाचे रेस्तराँ तर कोणाची एअरलाइन्स, जाणून घ्या साउथ स्टार्सचे साइड बिजनेस

म्हापसेकरांच्या घरात बयो आजीचा वचक आहे. तिच्या मर्जीनंच घरातला कारभार चालतो. आता श्रावणातली सगळी व्रतवैकल्य करण्यासाठी राधानं पुढाकार घेतला आहे. तिच्या जावांचाही तिला पाठिंबा आहे. राधाची पहिली मंगळागौर असल्यानं म्हापसेकरांच्या घरात उत्साहाचं वातावरण आहे. मात्र, बयो आजीचा धाकही आहे. या धाकातून मुक्त करणं, घराला स्वातंत्र्य मिळवून देणं हे राधाचं उद्दिष्ट आहे. राधाच्या पहिल्या मंगळागौरीची जय्यत तयारी झाली आहे. घरातलं अनिष्ट दूर होऊन घर सुखानं नांदावं अशी प्रार्थना राधा मंगळागौरीच्या पूजेवेळी करते. त्याच दिवशी मंगळागौरीचे खेळ खेळताना राधाला कांचनचा गोठ सापडतो. या गोठमध्ये काहीतरी गुपित दडलं आहे. हे गुपित काय आहे, याचा उलगडा लवकरच होणार आहे.

वाचा : अँजेलिना जोलीचा घटस्फोटाचा निर्णय मागे, पुन्हा एकदा एकत्र येणार ब्रँजेलिना

मंगळागौरीच्या दिवशी नेमकं काय घडतं? राधाला कांचनचा गोठ कसा मिळतो? त्यात काय असतं हे तुम्हाला ‘गोठ’ मालिकेच्या आगामी भागांमध्ये पाहायला मिळेल.