फार पूर्वीपासून चित्रपट आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहेत. चित्रपट हे मनोरंजनाच्या उद्देशाने बनवलेले असतात. यातील काही चित्रपट वेगळ्या धाटणीचे आहेत. ज्यांची मांडणी, थिम थोड्या अनोख्या पद्धतीने आखलेल्या आहेत. मराठी नववर्षाची सुरुवात अशाच काही चित्रपटांसोबत झी टॉकीज वाहिनी प्रेक्षकांसोबत करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुढीपाडव्याच्या दिवशी झी टॉकीज आपल्या लाडक्या प्रेक्षकांसाठी काही खास चित्रपट सादर करणार आहे. १३ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजल्यापासून प्रेक्षक झी टॉकीजवर सदाबहार चित्रपटांची मेजवानी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अनुभवू शकतात.

१३ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता मकरंद अनासपुरे याचा सुपरहिट चित्रपट ‘दे धक्का’ प्रसारित होईल. त्यानंतर ११ वाजता देऊळ बंद हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. दुपारी १.३० वाजता सायली संजीव हिचा बस्ता तर ४ वाजता सचिन आणि सुप्रिया पिळगावकर या धमाल जोडीचा ‘नवरा माझा नवसाचा’ हा चित्रपट प्रसारित होईल आणि रात्री श्रीखंड पुरीच्या बेतासोबत १० वाजता मी शिवाजी राजे भोसले बोलतोय या चित्रपटाचा आस्वाद प्रेक्षक घेऊ शकतात.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gudhipadwa special zee marathi movies avb
First published on: 12-04-2021 at 16:36 IST