७ मार्च (शक्रवार ) रोजी प्रदर्शित झालेला बहुचर्चित चित्रपट ‘गुलाब गँग’च्या नावाने मोबाईल गेमची निर्मिती करण्यात आली आहे. चित्रपटात दाखविण्यात आलेल्या सामाजिक प्रश्नांवर आधारित या गेमचे स्वरूप असून, ‘गुलाब गँग – दी गेम’ असे या मोबाईल गेमचे नाव आहे. चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या हस्ते या मोबाईल गेमचे अनावरण करण्यात आले. गुलाब गँग आणि गुंडा गँगमधील संघर्ष या गेममध्ये आहे.

गेमची प्रमुख वैशिष्ट्ये –

  • अॅक्शन प्रकारातील या गेममध्ये २५ पातळ्या आहेत
  • अनेक गँग सदस्य निवडण्याची सोय
  • प्रत्येक पातळीत खास अशी शस्त्रे आणि व्यक्तिरेखा आहेत
  • जोरदार हल्ला करण्यासाठी ताकद वाढविण्याची सोय 
  • सह-सदस्यांची श्रेणी वाढविण्याची सोय
  • सोशल मिडिया इंन्टिग्रेशन
  • तुमचे स्वत:चे गेम प्रॉफाईल करून कूल अवतार धारण करू शकता
  • नवीन मित्रांना सामील करून त्यांना आव्हान देऊ शकता
  • जास्तित जास्त स्कोर करून नोंदविण्याची सोय