अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सोशल मीडियाद्वारे स्टार किड्सवर जोरदार टीका होत आहे. या घराणेशाहीच्या वादात आता अभिनेते गुलशन ग्रोवर यांनी देखील उडी घेतली आहे. “मी कठोर परिश्रमांतून तयार झालेलं प्रोडक्ट आहे. पण या बॉलिवूडनेच मला मोठं केलं” असं प्रत्युत्तर त्यांनी टीकाकारांना दिलं आहे.
अवश्य पाहा – सेम टू सेम; हुबेहुब WWE सुपरस्टार्ससारखे दिसतात हे सेलिब्रिटी
हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत गुलशन ग्रोवर यांनी बॉलिवूडमधील घराणेशाहीवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “मी कठोर परिश्रमांतून तयार झालेलं प्रोडक्ट आहे. शत्रूघ्न सिन्हा यांच्यामुळे मला काम मिळालं. अमिताभ बच्चन यांनी माझी शिफारस केली होती. अनेक दिग्दर्शक आणि निर्मात्यांमुळे मला हे यश मिळालं आहे. जर तुमच्यात क्षमता असेल, मेहनत करण्याची तयारी असेल तर लोक तुमच्या मदतीला उभे राहतात. अर्थात काही लोक तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात. पण अशा प्रवृत्ती प्रत्येक क्षेत्रात पाहायला मिळतील. पण त्यांच्यामुळे संपूर्ण क्षेत्राला दोष देणं योग्य नाही. प्रत्येक स्टार किड्स काही सुपरस्टार होऊ शकत नाही. ज्यांच्यामध्ये क्षमता नसते त्यांना प्रेक्षक नाकारतात.” असं मत गुलशन ग्रोव्हर यांनी मांडलं.
तारक मेहतामध्ये ‘या’ ग्लॅमरस अभिनेत्रीची एण्ट्री; साकारणार अंजली भाभीची भूमिका
यानंतर त्यांनी सुशांत प्रकरणावरही आपलं मत व्यक्त केलं. “सुशांतला न्याय मिळायलाच हवा. या प्रकरणातील सत्य लवकरच समोर येईल. परंतु तो पर्यंत अर्धवट माहितीच्या आधारे कोणालाही दोष देणं योग्य नाही. मी महेश भट्ट यांच्यासोबत काम केलं आहे. दे बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांपैकी एक आहेत. मी त्यांचा सडक २ हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहे.” असं ते म्हणाले.
