कर्नाटकातील ‘हंपी’ हे गाव आपल्यापैकी बहुतेकांना माहीत असेल. मात्र, प्रकाश कुंटे दिग्दर्शित आगामी चित्रपटाचं नावच ‘हंपी’ आहे. स्वरूप समर्थ एण्टरटेनमेन्टच्या योगेश निवृत्ती भालेराव आणि डिजिटल डिटॉक्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून चैतन्य गिरीश अकोलकर यांनी प्रस्तुती केली आहे. दिवाळीनंतर ३ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. दरम्यान या चित्रपटाचा पहिला टीजर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाचा : जाणून घ्या सलमान-संजूबाबाच्या त्या ‘सिक्रेट’ भेटीनंतर काय घडले…

या टीजरमध्ये कन्नड रिक्षावाल्याच्या भूमिकेत असेलला अभिनेता प्रियदर्शन जाधव वेलकम टू ‘हंपी’ असं म्हणताना दिसतो. अत्यंत मजेशीर अशा या टीजरने चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण केली आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता माळी, ललित प्रभाकर अशी उत्तम कलाकार मंडळी या चित्रपटात पहायला मिळणार आहेत. एका मुलीचा भावनिक प्रवास या आशयसूत्रावर हा चित्रपट बेतला आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद अदिती मोघेचे असून, सिनेमॅटोग्राफर म्हणून अमलेंदु चौधरी यांनी काम पाहिले आहे.

वाचा : आदित्य पांचोली आणि झरीना वहाबने कंगनाला पाठवली मानहानीची नोटीस

प्रकाश कुंटेने या पूर्वी ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘अँड जरा हटके’ असे दमदार चित्रपट केले आहेत. त्यामुळे ‘हंपी’ या चित्रपटातून प्रकाश पुन्हा नवं काहीतरी घेऊन येणार हे नक्की!

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hampi the movie teaser sonalee kulkarni prajakta mali lalit prabhakar priyadarshan jadhav
First published on: 25-09-2017 at 15:56 IST