झाडाखाली बसलेल्या मोदींचा फोटो पाहून बॉलिवूडमधील दिग्दर्शक म्हणतो…

मोदींच्या निसर्ग प्रेमावर बॉलिवूड दिग्दर्शचा उपरोधिक टोला; म्हणाले…

जनतेने मोदींवर विश्वास ठेवून दुसऱ्यांदा पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करण्याची संधी त्यांना दिली. पूर्ण बहुमताचे सरकार सत्तेवर असले की, जनतेलाही बऱ्याच अपेक्षा असतात. सरकारकडून काही ठोस निर्णयांची अपेक्षा असते. पंतप्रधान मोदींनी वेळोवेळी ते सिद्ध सुद्धा केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं निसर्गाप्रति असलेलं प्रेम कधीच लपून राहिलेलं नाही. भाषणात किंवा मुलाखतीत त्यांनी याबद्दल अनेकदा भाष्य केलं आहे. पक्षीप्रेमाचा असाच एक व्हिडीओ आणि फोटो मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यांच्या या फोटोवर बॉलिवूड दिग्दर्शक हंसल मेहता यांनी उपरोधिक टोला लगावला आहे.

नरेंद्र मोदी बागेत बसून पेपर वाचत आहेत. आणि त्यांच्या शेजारी बदकं उभी आहेत. असा हा फोटो सध्या सर्वत्र चर्चेत आहे. “या प्रोडक्शन डिझायनरला काढा” अशा आशाचं ट्विट करुन हंसल मेहता यांनी या फोटोवरुन मोदींना उपरोधिक टोला लगावला आहे. त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

मोदी यांनी इन्स्टाग्राम आणि यू ट्यूबवर मोराचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात मोदींच्या निवासस्थानी मोर आल्याचं दिसत आहे. निवास्थानी आलेल्या या खास पाहुण्यांची मोदी यांनी काळजी घेतली. या मोरांना मोदी दाणे टाकत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. या व्हिडीओत दिसणारा मोर याआधीही पंतप्रधानांच्या घरासमोरील बागेत दिसला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Hansal mehta comment on narendra modi viral photo mppg

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या