२१ सप्टेंबर १९५५ साली दिल्लीमध्ये जन्मलेल्या गोवर यांनी आजवर ४०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. विशेष म्हणजे गुलशन यांनी ‘रॉकी’ चित्रपटात केलेल्या अभिनयामुळे ते प्रेक्षकांच्या पसंतीत उतरले आणि पाहता पाहता ते बॉलिवूडमधील एक यशस्वी अभिनेता म्हणून ओळखले जाऊ लागले.
गुलशन यांच्या वाट्याला अनेक वेळा खलनायकाच्या भूमिका आल्याचं पाहायला मिळतं. मात्र या भूमिकांना त्यांनी पुरेपूर न्याय दिला. यामुळेच त्यांना बॉलिवूडमधील ‘बॅडमॅन’ हे नवं नावही मिळालं.
‘येस बॉस’, ‘मोहरा’, ‘राम लखन’, ‘राजा बाबू’, ‘सोहनी महिवाल’ यांसह अनेक चित्रपटांत त्यांनी आपल्या अभिनयाची वेगळी छाप सोडली. त्यानंतर डिज्नीच्या जंगल बुकच्या सिक्वेलमध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाली. यामुळे आज ते आंतरराष्ट्रीय स्तरावरही उत्तम अभिनेता म्हणून ओळखले जातात.
दरम्यान, गुलशन ग्रोवर यांच्या ‘बॅडमॅन’ या नावावर आधारित चित्रपटाची निर्मिती देखील करण्यात आली असून या चित्रपटामध्ये त्यांनी नायकाची भूमिका केली आहे.