‘राम तेरी गंगा मैली’ या १९८५ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात बोल्ड सीन्स दिल्यामुळे अभिनेत्री मंदाकिनी चर्चेत होती. या चित्रपटाने तिला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले. या चित्रपटातील तिचा साधाभोळा पण, तितकाच मादक अंदाज अनेकांची मनं जिंकून गेला. विशेष म्हणजे या चित्रपटातील मंदाकिनीचं एक गाण प्रचंड गाजलं. मात्र अनेकांनी त्यावर टीकादेखील केली.

३० जुलै १९६९ रोजी मंदाकिनीचा जन्म झाला. तिने १९८५ साली अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटानंतर तिने जवळपास ६ वर्षे इंडस्ट्रीमध्ये काम केले. पण नंतर अचानक मंदाकिनी गायब झाली. ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातील ‘तुझे बुलाएँ ये मेरी’ हे गाणं त्याकाळी प्रचंड गाजलं होतं. या गाण्यामध्ये मंदाकिनीने अनेक बोल्ड सीन दिले असून धबधब्याखाली अंघोळ करतानाचा तिचा व्हिडीओ विशेष गाजला होता. या गाण्यानंतर त्याकाळी बोल्ड सीन देणारी अभिनेत्री म्हणून मंदाकिनीकडे पाहिलं जात होतं. ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यु करणाऱ्या मंदाकिनीचा आलेख या चित्रपटानंतर प्रचंड उंचावला. मात्र त्यानंतर काही कारणांमुळे तिला चित्रपटसृष्टीतून काढता पाय घ्यावा लागला.

is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक

आणखी वाचा : आलिशान घर ते लग्झरी गाड्या; ‘संजूबाबा’ आहे इतक्या कोटींचा मालक

चित्रपटांमुळे लोकप्रिय ठरलेल्या मंदाकिनीचं नाव मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी, डॉन दाऊदशीही जोडलं गेलं होतं. दाऊद आणि मंदाकिनीचे प्रेमसंबंध होते अशी चर्चा होती. आम्ही केवळ मित्र आहोत, असं मंदाकिनीने सांगितलं होतं. मात्र दाऊदसोबत नाव जोडले जात असल्याच्या चर्चांना उधाण येताच मंदाकिनी एकाएकी चित्रपटसृष्टीपासून दूर गेली.