या मायानगरी मुंबईत स्वतःचं असं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. म्हाडा त्यांना त्यांचं ते घर उभारण्यात मदतही करतं. म्हाडाच्या ९७२ घरांची सोडत आज निघाली. आपलं नशिब आजमवण्यासाठी एक लाखांहून अधिक लोक यासाठी अर्ज करतात. यात यावेळी काही मराठी कलाकार ही नशिबवान ठरले आहेत. अभिनेत्री हेमांगी कवी आणि सुहास परांजपे यांना यावेळी मागाठाणे- बोरिवलीमध्ये घर लागलं असून त्याही आता पक्क्या ‘मुंबईकर’ झाल्या आहेत. हेमांगीने आतापर्यंत आठ वेळा जिद्दीने म्हाडाच्या घरासाठी अर्ज भरला होता.
हेमांगी बरोबरच अनेक मालिका आणि कॉमेडी शोमधून दिलखुलास हसवणाऱ्या आणि सध्या नांदा सौख्य भरे मालिकेतून नकारात्मक भूमिकेसाठी प्रेक्षकांची वाहवा मिळवणारी हरहुन्नरी अभिनेत्री सुहास परांजपेलाही म्हाडाचे घर लागले आहे. अभिनेत्री छाया कदम यांनाही सायनच्या प्रतिक्षानगरमध्ये घर लागलं आहे.
म्हाडाच्या ९७२ घरांची लढत आज काढण्यात येत आहे. १ लाख ३५ हजार ५७७ जणांनी या घरासाठी अर्ज केले होते.
या मराठी तारे- तारकांशिवाय ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधून घरा घरात पोहचलेला ‘मिस्टर अय्यर’ म्हणजेच तनुज महाशब्दे, अभिनेत्री सिमा बिस्वास, श्रुती मराठे, मेघना एरंडे अशा अनेकांनी यावेळी अर्ज केले आहेत.