अभिनेत्री आणि डान्सर हेमांगी कवी धुमाळ नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. हेमांगी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. तर यासोबत ती बिनधास्तपणे तिचं मतं मांडताना दिसते. हेमांगीने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

हेमांगीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये पेट्रोल विषयी बोलताना हेमांगी म्हणाली, “ह्या पेट्रोल दरवाढी वर लिंबू फिरवायचा होता मला पण आता…लिंबू वर पेट्रोल फिरवणार आहे!” हेमांगीची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

somaiya school principal parveen shaikh sack over hamas posts
पॅलेस्टाईन-इस्त्रायल संघर्षासंदर्भात पोस्ट : सोमय्या शाळेने मुख्याध्यापिकेला नोकरीवरून काढले
Palestine-Israel, Somaiya School,
पॅलेस्टाईन-इस्रायल संघर्षासंदर्भात पोस्ट : मुख्याध्यापिकेला लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश, सोमय्या शाळेच्या व्यवस्थापनाकडून आदेश
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
bmrcl
मळलेले कपडे, तुटलेली शर्टाची बटणं पाहून तरुणाला मेट्रोतून प्रवास करण्यापासून रोखलं, बंगळुरू मेट्रोची असंवेदनशीलता

आणखी वाचा : “जेव्हा मुस्लीम बहुसंख्यांक असतो तेव्हा हिंदू…”, शरद पवारांचं The Kashmir Files वरील वक्तव्य चर्चेत

आणखी वाचा : “मी तुमच्या आणि तुमच्या पत्नीच्या पाया पडलो आणि तुम्ही…”, शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर विवेक अग्निहोत्रीने दिलं उत्तर

आणखी वाचा : “दुश्मन…”, देवेंद्र फडणवीस यांना पाहून एकनाथ खडसेंनी गायलेल्या गाण्याची होतेय चर्चा

हेमांगीची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर मजेशीर कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, “खूप उशिरा पोहोचला पेट्रोलचा चटका.” दुसरा नेटकरी म्हणाला, “तुमच्या घरातली सायकल ती बाहेर काढा.” तिसरा नेटकरी म्हणाला, “काळजी करू नका मॅडम, काळी बाहुली बांधा, लिंबु, मिरची बांधा गाडीला पेट्रोल कमी होईल की नाही माहिती नाही पण नजर नाही लागणार गाडीला तुमच्या.” आणखी एक नेटकरी म्हणाला, “लिंबूटिंबू विचारांच्या हातात सत्ता दिली की सामान्यांवर अशी पाळी येते!”