छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो पैकी एक म्हणजे खतरों के खिलाडी. बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी सूत्रसंचालन करत असलेल्या ‘खतरों के खिलाडी ११’ हा शो सध्या चर्चेत आहे. हा शो कोणता कलाकार जिंकणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. दरम्यान, ग्रॅंड फिनालेपूर्वीच खतरों के खिलाडी ११ च्या विजेत्याचे नाव समोर आले आहे.
खतरों के खिलाडी सिझन ११मध्ये दिव्या त्रिपाठी, श्वेता तिवारी, राहुल वैद्य, अर्जुन बिजलानी, अभिनव शुक्ला, निक्की तंबोळी आणि इतर काही कलाकार सहभागी झाले होते. आता या शोमध्ये ट्रॉफि कोण जिंकणार या चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान अर्जुन बिजलानीने खतरों के खिलाडी ११ हा शो जिंकल्याचे समोर आले आहे.
चित्रपट समीक्षक सलील कुमार यांनी त्यांच्या ट्विटर आकाऊंटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी अर्जुनचा फोटो शेअर करत ‘अर्जुन बिजलानीने ट्रॉफी जिंकली आहे. त्याचे अभिनंदन’ या आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे.

दरम्यान, अर्जुन बिजलानीने खतरो केखिलाडी ची ट्रॉफी जिंकल्यानंतर कुटुंबीय आनंद व्यक्त करत आहेत. अर्जुनच्या पत्नीने आनंद साजरा करण्यासाठी पार्टीचे नियोजन केले होते. त्या पार्टीमधील काही फोटो त्याच्या पत्नीने इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला ठेवले होते. हे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चर्चेत आहेत. अनेकांनी अर्जुनला शुभेच्छा दिल्या आहेत. अर्जुनने ‘इश्क मे मरजावा’, ‘नागिन’, ‘परदेस मे है मेरा दिल’, ‘डान्स दिवाने’ या शोमधून अनेकांची मने जिंकली होती.