मॉडेल व अभिनेत्री गुल पनाग हिने तिच्या मुलासोबतचा एक व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केल्यानंतर त्यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे. गुल पनागच्या चिमुरड्याने एका मासिकावरील मोदींच्या फोटोला ओळखलं. त्याचाच व्हिडीओ तिने ट्विटरवर पोस्ट केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हिडीओत ती मुलाला विचारते की, मासिकावर हा कोणाचा फोटो आहे? त्यावर तो ‘मोदी’ असं उत्तर देतो. हे ऐकून गुल त्याला म्हणते, ‘मोदीजी’. ”माझा मुलगा निहाल आता मासिक व वृत्तपत्रांवरील फोटो पाहून मोदींना ओळखू लागला आहे. त्याने माझंही लक्ष वेधून घेतलं. हे क्षण कॅमेऱ्यावर टिपण्याचा मी प्रयत्न केला आहे,” असं तिने त्या व्हिडीओसोबत लिहिलं.

यावर मोदींनी लिहिलं, ”अत्यंत निरागस! निहालला माझ्याकडून खूप आशीर्वाद.. त्याला भविष्यात जे काही करायचं असेल त्यासाठी शुभेच्छा. तुमच्यामध्येही त्याला एक मार्गदर्शक व गुरू सापडेल अशी मला खात्री आहे.”

गुल पनागने वयाच्या चाळीसाव्या वर्षी पायलट ऋषी अट्टारीशी लग्न केलं. २०१८ मध्ये ती आई झाली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Here is why pm modi suddenly called gul panag son extremely adorable ssv
First published on: 17-10-2019 at 16:57 IST