होळी हा वाईट प्रवृत्तींचा नायनाट करण्याचा सण. या दिवशी प्रत्येक गावात, शहरात, घरापुढे होळी पेटविली जाते. या होळीसोबत वाईट गोष्टींचा, प्रवृत्तींचा नाश होवो आणि सकारात्मक उर्जेची निर्मिती होवो, अशी मनोकामना सारे जण करतात. याच होळीच्या दिवशी घाडगे & सून  या मालिकेत कियाराचं खरं रुप अमृता समोर येणार आहे.

सध्या सगळीकडेच होळी आणि रंगपंचमीची लगबग सुरु झाली आहे. लहानथोरांपासून कलाविश्वामध्येही हाच उत्साह दिसून येत आहे. मग या उत्साहाच्या दिवसांमध्ये छोट्या पडद्यावरील कलाकार तरी कसे मागे राहतील ? त्यामुळे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका घाडगे & सून  या मालिकेमध्येही होळीच्या सणाचा उत्साह सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र या उत्साहामध्ये एक गालबोट लागण्याची शक्यता असल्याचं दिसून येत आहे. कियारा गरोदर नसल्याचं अमृताला समजणार आहे.

कियारा गरोदर नसल्याचं अक्षयला यापूर्वीच समजलं आहे. मात्र तिचं हे सत्य घरातल्यांसमोर कसं सांगावं हा मोठा प्रश्न त्याला पडला आहे. त्यामुळे त्याने ही गोष्ट घरातल्यांपासून लपविली आहे. मात्र त्याच्या वागण्यात मोठा बदल झाला आहे. त्याची सतत चिडचिड होत आहे. विशेष म्हणजे त्याच्या स्वभावात झालेला बदल घरातल्यांनाही समजला आहे. मात्र आता होळीच्या दिवशी त्याच्या चिडचिड करण्यामागचं कारण आणि कियाराचं सत्य अमृतासमोर येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

होळीचं दहन होत असताना कियारा गरोदर नसल्याचं अमृताला समजलं आहे. मात्र कियाराने घाडगे परिवारासोबत आणि तिच्यासोबत केलेलं इतक मोठं कारस्थान ती घरच्यांना आणि अक्षयला सांगू शकेल ? कोणत्या अडचणी तिच्यासमोर येतील ? आणि हे समजल्यावर माई आणि घरातील इतर सदस्य कसे स्वत:ला सावरतील ? हे बघणे रंजक असणार आहे. तसेच रंगपंचमी देखील घाडगे सदनमध्ये साजरी केली जाणार आहे. त्यामुळे हा रंजक भाग पाहायला विसरु नको.