सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तो एक यशस्वी अभिनेता होता. परंतु नैराश्येच्या गर्तेत जाऊन त्याने आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे. असाच काहीसा प्रकार हॉलिवूड चित्रपट निर्माता स्टीव्ह बिंग यांच्या बाबतीत घडला आहे. डिप्रेशनमध्ये गेलेल्या स्टीव्ह बिंग यांनी २७व्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अवश्य पाहा – “खरंच माफी मागायची गरज नव्हती”; सलमानच्या ‘त्या’ ट्विटवर सोना मोहापात्रा संतापली

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार ५५ वर्षीय स्टीव्ह गेल्या अनेक महिन्यांपासून नैराश्येमध्ये होते. त्याचा उपचार देखील सुरु होता. दरम्यान त्यांना करोना विषाणूमुळे आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र या आयसोलेशनमुळे त्यांच्या नैराश्यात आणखी वाढ झाली. परिणामी त्यांनी सोमवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास लॉस एंजलिसमधील सेंच्यूरीसिटीमध्ये एका लक्झरी अपार्टमेंटच्या २७ व्या मजल्यावरून उडी घेत आपलं आयुष्य संपवलं.

अवश्य पाहा – लॉकडाउनमुळे अभिनेत्री अडकली लंडनमध्ये; एक झलक पाहण्यासाठी फॅन्स घराखाली करतात गर्दी

स्टीव्ह बिंग हॉलिवूड सिनेसृष्टीतील एक नामांकित निर्माते म्हणून ओळखले जायचे. त्यांनी आजवर ‘सिटी ऑफ सिन’, ‘मार्ले’, ‘शाईन अ लाईट’, ‘द बिग बोनस’ यांसारख्या अनेक चित्रपटांची निर्मिती केली होती. एलिझाबेथ हर्लेसोबत असलेल्या रिलेशनशिपमुळे ते प्रचंड चर्चेत होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hollywood producer steve bing suicide due to depression mppg
First published on: 23-06-2020 at 18:21 IST