सासू जिंकणार की सून? जाव आणि नणंदेचीही जुगलबंदी; आदेश भावोजी देणार मनोरंजनाची लस

वटपौणिमेपासून होम मिनिस्टरचं हे नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं.

adesh bandekar, zee marathi, home minister,
'होम मिनिस्टर घरच्या घरी' या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदेश भावोजी आपल्या भेटीला येत होते.

देशभरात करोनाचा प्रादुर्भाव, लॉकडाउनच्या काळात अनेक गोष्टींवर असलेले निर्बंध, यामध्ये मालिका, सिनेमांच्या चित्रीकरणावर पूर्णपणे बंदी अशावेळी ‘होम मिनिस्टर घरच्या घरी’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदेश भावोजी आपल्या भेटीला येत होते. पण आता अनलॉक नंतर पुन्हा ‘होम मिनिस्टरचा’ कॅमेरा वहिनींच्या घरी जाण्यासाठी सज्ज आहे. वटपौणिमेपासून होम मिनिस्टरचं हे नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं.

माहेर कितीही आवडलं तरी आपण माहेरी कायम राहू शकत नाही. माहेरवाशिणीला आपली पाऊलं सासरी परत आणावीच लागतात. म्हणूनच होम मिनिस्टर आपलं नवं पर्व आता सासरी करणार आहेत. सासरची वाट कितीही गोड असली तरी तिथे नाजूक सुया आपल्या पायांना टोचतातच. कारण सासर म्हणजे जबाबदारी, सासर म्हणजे दडपण, सासर म्हणजे कर्तव्य. पण या सगळ्या भावनांना मनातून कितीही वाटलं तरी कधी मोकळी वाट मिळत नाही. आपण होम मिनिस्टरच्या नव्या सीजनमधून याच कडू गोड आठवणींची वाट मोकळी करून देणार आहोत.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

‘होम मिनिस्टर’मध्ये वहिनी, सासू, जाऊ, नणंद एकाच घरात नांदणाऱ्या या माऊली पैठणीचा मान मिळवण्यासाठी खेळातून आणि गप्पा मधून एकमेकांना सामोऱ्या जातील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Home minister serial started again avb

ताज्या बातम्या