छोट्या पडद्यावरील तमाम मराठी प्रेक्षकवर्गाला उत्सुकता लागून राहिलेला ‘तो’ क्षण अखेर प्रत्यक्षात आला आहे. ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतील जान्हवीने मुलीला जन्म दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेचा प्रेक्षकवर्ग श्री -जान्हवीला बाळ कधी होणार याकडे डोळे लावून बसला होता. जान्हवीचं लांबलेलं बाळंतपण हा सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला होता, त्यामुळे मालिकेसोबतच या प्रश्नालाही आता पूर्णविराम मिळणार आहे. श्री-जान्हवीच्या लेकीच्या बारशाच्या समारंभानेच ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेचा गोड शेवट होणार आहे. येत्या २३ जानेवारी रोजी प्रक्षेपित होणाऱ्या मालिकेच्या शेवटच्या भागात हे पाहता येईल. या मालिकेने नुकताच ७५० भागांचा टप्पाही पार केला होता.
काही दिवसांपूर्वीच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. गेले अडीच वर्ष चालत आलेल्या या मालिकेने मराठी कुटुंबातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. जान्हवी आणि तिच्या सहा सासवांमुळे घराघरातील सासू-सुनेच्या नात्यात गोड बदल झाले. तर जान्हवीचा ‘काहीही हां श्री’ संवाद, तिचे बाळंतपण याविषयीचे भन्नाट विनोद सोशल मिडियावर बरेच गाजले. शशिकला बाईंचा (जान्हवीची आई) खाष्ट स्वभावाचा अनेकांनी राग केला पण त्यांची केलेल्या अप्रतिम अभिनयाची सर्वांनीच प्रशंसाही केली. श्री-जान्हवीचे प्रेम त्यांचे लग्न, सहा सासवा, समंसज बाबा, खाष्ट सासू अशा अनेक गोष्टींनी प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले होते.
संग्रहित लेख, दिनांक 12th Jan 2016 रोजी प्रकाशित
अखेर जान्हवीला बाळ झालं; बारशाच्या समारंभाने मालिकेचा गोड शेवट
या मालिकेचा प्रेक्षकवर्ग श्री -जान्हवीला बाळ कधी होणार याकडे डोळे लावून बसला होता
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 12-01-2016 at 07:51 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Honar soon mi hya gharchi give birth to baby child