आपल्या अभिनयानं भारतीय चित्रपट विश्वाला समृद्ध करणारे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं गुरूवारी मुंबईत निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. बुधवारी त्यांना मुंबईतील एच.एन. रिलायन्स रूग्णालयात दाखल करण्यात आले होतं. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. भारतीय सिनेमाला रोमँटिक चेहरा देणाऱ्या या कलावंताच्या जाण्यानं सर्वच जण हळहळले.

बॉलिवूड आणि इतर जगभारतील त्यांचे चाहते त्यांना ऋषी कपूर या नावाने ओळखत असले तरी घरात त्यांना चिंटू म्हटले जाते. चिंटू हे नाव कसं पडलं याचा रंचक किस्सा २०१५ मध्ये ऋषी कपूर यांनी एका मुलाखतीत सांगितला होता.. भाऊ रणधीर कपूर चिंटू नावाने बोलवत असल्याचे ऋषी कपूर यांनी सांगितले होते. ते म्हणाले की, शाळेत होतो तेव्हापासून रणधीर कपूर एक कविता ऐकवत होते. ‘छोटे से चिंटू मियां, लंबी सी पूंछ, जहां जाए चिंटू मियां, वहां जाए पूछ.’ ही कविता भाऊ रणधीर कपूर मला ऐकवतं असे.

भावाच्या निधनावर प्रतिक्रिया देताना रणधीर कपूर म्हणाले की, ‘ त्यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून ते कर्करोगाशी लढत होते. तबीयत खराब झाली म्हणून बुधवारी रात्री त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. अमेरिकामध्ये वर्षभर त्यांनी कर्करोगावर उपचार घेतला होता.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऋषी कपूर यांचा जन्म ४ सप्टेंबर १९५२ रोजी दक्षिण मुंबईत झाला. ‘चिंटू’ या टोपण नावानेही ते ओळखले जात. बॉलिवूडचे शोमॅन दिग्दर्शक आणि अभिनेते राज कपूर यांचे ते दुसरे पुत्र. ज्येष्ठ बंधू रणधीर कपूर आणि राजीव कपूर यांच्यासोबत त्यांनी मुंबईतील कॅम्पेन स्कूल कॉन्व्हेंट स्कूलमधून शिक्षण घेतलं. ऋषी कपूर यांनी जवळपास ९२ चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. सगळ्याच पिढ्यांमध्ये त्यांचा चाहतावर्ग होता. काही दिवसांपूर्वीच कर्करोगाशी यशस्वी झुंज देऊन ऋषी कपूर भारतात परतले होते. ११ महिने ११ दिवस न्यूयॉर्कमध्ये उपचार घेऊन ते भारतात परतले होते.