बॉलिवूडमधील हिट चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे ‘धूम २.’ या चित्रपटात अभिनेता हृतिक रोशन, ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट २४ नोव्हेंबर २००६ साली प्रदर्शित झाला होता. आज या चित्रपटाला प्रदर्शित होऊन १५ वर्षे झाली आहेत. या चित्रपटात हृतिक, ऐश्वर्या, अभिषेकसोबतच बिपाशा बासू, उदय चोप्रा आणि रिमी सेन यांनी देखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहे. या चित्रपटाच्या वेळी अभिषेक आणि ऐश्वर्याचे लग्न झाले नव्हते. पण तुम्हाला माहितीये का याच चित्रपटाच्या वेळी ऐश्वर्या विषयी हृतिकचा गैरसमज झाला होता.

ऐश्वर्या ही एक केवळ दिसायला सुंदर आहे असे हृतिकला सतत वाटायचे. एका मुलाखतीमध्ये हृतिकने याबाबत वक्तव्य केले होते. हृतिकला असे वाटायचे की ऐश्वर्या एक अशी अभिनेत्री आहे जी केवळ सुंदर दिसते. तिच्यामध्ये टॅलेंट नाही. पण जेव्हा तिच्यासोबत त्याने शूटिंग केलं तेव्हा त्याचा गैरसमज दूर झाला असे म्हटले आहे.
आणखी वाचा : ‘मिस्टर बीन’च्या निधनाची अफवा; पाहा कशामुळे पसरली Death Hoax

‘कधीकधी असे असते की सुंदर दिसणाऱ्या माणसांना प्रचंड गर्व असतो. पण जेव्हा मी ऐश्वर्यासोबत काम केले तेव्हा मला कळाले की ती केवळ सुंदरच नाही तर तिचा अभिनय देखील अप्रतिम आहे. ती मनाने देखील सुंदर आहे. मी तिच्यासोबत काम केले नव्हते तोपर्यंत मला सारखे वाटायचे की ती केवळ सुंदर आहे, तिला अभिनय चांगला येत नाही. जेव्हा मी तिच्यासोबत धूम २मध्ये काम केले तेव्हा सर्व गैरसमज दूर झाले. तिचे कामाकडे फार लक्ष असते. प्रत्येक सीन परफेक्ट व्हावा यासाठी ती प्रयत्न करत असते’ असे हृतिक म्हणाला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘धूम २’ चित्रपटातील हृतिक आणि ऐश्वर्याची जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली होती. त्यानंतर हृतिक आणि ऐश्वर्याने ‘जोधा अकबर’ आणि ‘गुजारिश’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते.