अभिनेता हृतिक रोशन बॉलिवूडचा हॅण्डसम हंक म्हणून ओळखला जातो. अगदी त्याच्या लूकपासून अभिनयापर्यंत तो प्रत्येक गोष्टीमध्ये परफेक्ट असल्याचं साऱ्यांनाच ठाऊक आहे. यामुळेच हृतिकचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. अनेकदा चाहते त्यांच्या आवडत्या कलाकारासाठी वाट्टेल ते करताना दिसतात. असंच हृतिकच्या बाबती घडताना पाहायला मिळालं. इंफाळमधील त्याच्या एका चाहत्याने त्याच्या बाळाचं नाव हृतिक ठेवल्याचं पाहायला मिळालं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंफाळमधील हृषिकेश अंगोम हा हृतिकचा मोठी चाहता असून त्याने त्याच्या बाळाचं नाव हृतिक ठेवलं आहे. विशेष म्हणजे हे नाव ठेवण्यामागे एक खास कारण आहे. हृषिकेश यांच्या बाळाच्या हाताला हृतिकप्रमाणे सहा बोटं आहेत. त्यामुळे त्याने हृतिकचं नाव आपल्या बाळाला दिलं आहे.

“कहो ना प्यार है चित्रपटापासून मी हृतिकचा खूप मोठा फॅन झालो. माझं खरं नाव ऋषिकेश आहे. मात्र, मी माझ्या नावात हृ जोडून ते हृषिकेश केलं. काल मला मुलगा झाला आणि योगायागाने त्याच्या हातालादेखील सहा बोटं आहेत. त्यामुळे मी त्याचं नाव हृतिक ठेवलं, असं हृषिकेश यांनी ट्विट करत सांगितलं.

दरम्यान, हृतिक हा दिग्दर्शक राकेश रोशन आणि पिंकी यांचा मुलगा आहे. हृतिकने ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असून हा चित्रपट २००० मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातून हृतिकने अनेक लोकांच्या मनात घर केलं. लॉकडाउनआधी हृतिक ‘वॉर’ या चित्रपटात दिसला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hrithik roshan fan name his newborn son as hrithik tweet goes viral dcp98
First published on: 24-11-2020 at 18:46 IST