अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खान यांचा घटस्फोट घटस्फोट बॉलिवूडमधील आजवरच्या सर्वाधिक धक्कादायक घटस्फोटांपैकी एक होता असे म्हटले जाते. तब्बल १४ वर्षांचे हे नाते एकाएकी तुटेल अशी अपेक्षा हृतिकच्या चाहत्यांना नव्हती. दोघांच्या विलग झाल्याच्या बातमीने नाराज झालेल्या चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांनी पुन्हा एकत्र यावे ही विनंती करण्यास सुरुवात केली. आश्चर्याची बाब म्हणजे पुन्हा हृतिक आणि सुझान एकत्र दिसूही लागले. त्यांचे फोटो सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल होऊ लागले. या फोटोंमुळे ते दोघे पुन्हा एकदा लग्न करणार अशा चर्चा रंगू लागल्या. मात्र हृतिकने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अशा शक्यतांना फेटाळून लावले आहे.

“आम्ही घटस्फोट घेतला असला, तरी आमच्यात मैत्रीचे नाते कायम आहे. रेहान आणि रिदान या दोन मुलांसाठी आम्ही एकत्र येतो. त्यांना आमच्याबरोबर चांगला वेळ घालवता यावा यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करतो.” असे हृतिकने या मुलाखतीत म्हटले. तसेच त्याने सुझानबरोबर पुन्हा एकदा लग्न करण्याच्या चर्चा अफवा असल्याचे म्हटले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घटस्फोट झाल्यानंतरही हृतिक आणि सुझान एकमेकांच्या मदतीला कायम धावून जात असल्याचे दिसते. हृतिक रोशनचे वडील राकेश रोशन आजारी असताना तसेच हृतिकची बहीण सुनैना आणि त्यांच्या कुटुंबियात निर्माण झालेल्या वादाच्यावेळी देखील सुझान रोशन कुटुंबियांसोबत सतत पाहायला मिळाली. कंगना रणौतने हृतिक रोशनवर आरोप केल्यानंतरही सुझानने हृतिकची बाजू घेतली होती.