लग्न करण्यासाठी उतावीळ असल्याचे बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान याने म्हटले आहे. सलमानची कथित प्रेयसी लुलिया वेंतुरसोबतच्या लग्नाबाबतच्या प्रश्नाला बगल देताना त्याने हे विधान केले. तो म्हणाला की, मला लग्न करायचं होतं. पण मला नेहमी समोरूनच होकाराची वाट पाहावी लागते. पुरूषांना याबाबतीत काहीच करावं लागत नाही. महिलाच असतात की ज्या सारं काही ठरवतात.
सलमान आपल्या ‘सुलतान’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी टेलिव्हिजनवरील एका रिआलिटी शोमध्ये आला होता. त्यावेळी एका स्पर्धकाने सलमानला लग्नाबाबतचा प्रश्न विचारला होता. गायक मिका सिंग या रिआलिटी शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत आहे. सलमानला विचारलेल्या प्रश्नावर मिकानेही मिश्किल प्रतिक्रिया दिली. आपण सलमानचा मोठा चाहता असून, मी त्याच्या पावलावर पाऊल ठेवतो. जेव्हा सलमान लग्न करेल त्याचवर्षी मी देखील लग्न करणार असल्याचे, मिका म्हणाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I am dying to get married salman khan
First published on: 24-06-2016 at 21:08 IST