‘स्नॅपचॅट’, ‘इन्स्टाग्राम’, ‘ट्विटर’ अशा अनेक ठिकाणी सध्या प्रचंड चर्चेत असणाऱ्या अभिनेता दिलजीत दोसांझच्या चाहत्यांचा आकडा अतिशय वेगाने वाढत आहे. ‘उडता पंजाब’ या बहुचर्चित आणि गाजलेल्या चित्रपटातून पंजाब पोलिसात काम करणाऱ्या एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत पंजाबी सुपरस्टार, अभिनेता दिलजीत दोसांझने हिंदी चित्रपटसृष्टीत दमदार पदार्पण केले आहे. ‘पंजाब १९८४’, ‘जाट अॅन्ड ज्युलिअट’, ‘सरदारजी- भाग १, २’, ‘अम्बरसरिया’ यांसारख्या पंजाबी चित्रपटांतून वेगळ्या धाटणीचा अभिनय सादर करत ‘देसी मुंडा’ दिलजीत त्याच्या ‘हार्ड कोर’ पंजाबी गायनशैलीनेही जगभरातील प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घालत आहे.
हिंदी चित्रपट सृष्टीत त्याच्या अभिनयासाठी ओळखला जाणारा दिलजीतने ‘आपण अभिनेत्याआधी एक गायक आहोत’ असे मत मांडले आहे. एका मुलाखतीत प्रसारमाध्यमांशी बोलताना ‘एक अभिनेता म्हणून मला जेव्हा समोरुन काम मिळतं त्यावेळी मला फार छान वाटतं, कारण तेव्हा मला अभिनयासाठी विचारणाऱ्या व्यक्तिंना माझ्यातल्या गायकासोबतच एक अभिनेताही हवा असतो, त्यांना माझ्याकडून फक्त गाणे गाउन घ्यायचे नसते’ असे दिलजीत म्हणाला. तेव्हा बॉलीवूडला गवसलेला हा नवीन ‘पंजाबी नायक’ बी टाउनमध्ये स्वत:ची जागा बनवण्यात नक्किच यशस्वी झाला आहे असे म्हणायला हरकत नाही. यापुढे ‘मला जेव्हा एखाद्या चित्रपटासाठी विचारले जाते, तेव्हा त्या चित्रपटातील गाणी मी गाणार कि नाही याबाबत सहसा विचारणा केली जात नाही’, असेही दिलजीत म्हणाला. अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि ‘फॉक्स स्टार’च्या निर्मितीत बनणारा ‘फिल्लौरी’ या चित्रपटातून दिलजीत पुन्हा एकदा पडद्यावर झळकणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी मार्च महिन्याच्या ३१ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I feel happy when people hire me only as an actor diljit dosanjh
First published on: 25-07-2016 at 18:32 IST