पॉर्न दुनियेला अलविदा करून बॉलीवूडमध्ये एण्ट्री केलेल्या अभिनेत्री सनी लिओनीने यावेळी एक अजब इच्छा व्यक्त केली. मला सलमान खान म्हणून पुनर्जन्म घ्यायला आवडेल अशी इच्छा सनीने व्यक्त केली आहे. सनी नेहमी सलमानची चाहती राहिलेली आहे. आजवर अनेकवेळा सनीने सलमानचे तोंडभरून कौतुक केले आहे.
सलमानमुळेच मी बॉलीवूडमध्ये- सनी लिओनी
सनीचा एक पहेली लीला हा चित्रपट येत्या काही दिवसांमध्ये प्रदर्शित होत असून या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान ‘बेबी डॉल’ सनीने आपल्या मनातील इच्छा व्यक्त केली. एक पहेली लीला हा चित्रपट पुनर्जन्मावर आधारित असून यासंदर्भातच सनीला प्रश्न विचारण्यात आला. यावर सनीने पुढील जन्मात सलमान खान म्हणून जन्म घ्यायची इच्छा असल्याचे सांगितले.
सनी लिओनीचे ‘दुग्धस्नान’
सलमान खान त्याच्या उदारमतवादी वागणुकीमुळे सर्वांना आपालासा वाटतो, बॉलीवूडमध्ये नव्या चेहऱयांना संधी देण्यासाठीचे त्याच्या प्रयत्नांबद्दल देखील सर्व परिचीत आहेत. कतरिना, सोनाक्षी आणि झरिन खान या बॉलीवूडमध्ये सध्या यशस्वी ठरलेल्या अभिनेत्रींच्या करिअरची सुरूवात सलमानसोबतच्या चित्रपटानेच झाली होती. या अभिनेत्रींच्या यशस्वी करिअरमार्गात आपला काहीच वाटा नसल्याचे जरी सलमान म्हणत असला तर, हा त्याचा मोठेपणा असल्याचे मनोगत सनी लिओनीने याआधीही व्यक्त केले होते.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Apr 2015 रोजी प्रकाशित
सलमान म्हणून पुनर्जन्म घ्यायला आवडेल- सनी लिओनी
पॉर्न दुनियेला अलविदा करून बॉलीवूडमध्ये एण्ट्री केलेल्या अभिनेत्री सनी लिओनीने यावेळी एक अजब इच्छा व्यक्त केली.
First published on: 02-04-2015 at 12:55 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I would like to be reborn as salman khan sunny leone