बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला. त्याने वयाच्या ३४व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. सुशांतने घराणेशाहीला कंटाळून इतके टोकाचे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे त्याच्या निधनानंतर घराणेशाही हा वाद पेटून उठला. काही कलाकारांनी घराणेशाहीमुळे त्यांना आलेले अनुभव सांगितले तर काहींनी बॉलिवूड सोडण्यामागचे कारण सांगितले. यावर बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने तिचे मत मांडत सल्ला दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वराने नुकतीच न्यूज लाँड्रीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने ज्यांना बॉलिवूडमध्ये बाहेरुन आलेल्यांची एवढी चिंता वाटते त्यांनी चित्रपटगृहांमध्ये जाऊन आमचे चित्रपट पाहायला हवेत असा सल्ला प्रेक्षकांना दिला आहे. तसेच तिने राजकुमार रावचा ‘ट्रॅप’, इरफान खान यांचा ‘कारवान’, नवाजुद्दीन सिद्दीकीचा ‘मोतीचूर का लाडू’ अशा अनेक चित्रपटांची बॉक्स ऑफिसवरील कमाई पाहा आणि स्टारकिड्सचे चित्रपट धडक, स्टूडंट ऑफ द इयर १-२, हिरोपंती यांची कमाई पाहण्यास सांगितले आहे. कोण स्टारकिड्सचे चित्रपट पाहण्यास जास्त उत्सुक असतं असे तिने म्हटले आहे.

तसेच तिने प्रेक्षकांनी कोणाचा चित्रपट पाहायचा याचा एकदा विचार करायला हवा असेही म्हटले आहे.

सुशांतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर स्टारकिड्सला प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. अनेकांनी ट्रोलिंगला कंटाळून त्यांचे कमेंट बॉक्स बंद केले तर काहींनी सोशल मीडियाला रामराम ठोकला.

स्वरा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती बिनधास्तपणे सोशल मीडियाद्वारे सामाजिक विषयांवर तिचे मत मांडताना दिसते. अनेकदा तिला ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो. पण स्वरा ट्रोलर्सला देखील सडेतोड उत्तर देताना दिसते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If you have so much concern for outsiders watch our films in theatres says swara bhaskar avb
First published on: 16-07-2020 at 17:38 IST