दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार विजय आणि अभिनेत्री नयनतारा यांच्यासह पुली चित्रपटातील कलाकारांच्या घरावर आयकर विभागाने बुधवारी छापा टाकला. बहुचर्चित पुली हा चित्रपट गुरूवारी प्रदर्शित होणार आहे. त्याआधीच चित्रपटातील कलाकारांच्या घरी आयकर विभागाच्या अधिकाऱयांनी छापा टाकल्याने खळबळ उडाली आहे.
बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास आयकर विभागाच्या अधिकाऱयांनी चेन्नई, मदुराई, कोचीन, त्रिवेंद्रम आणि हैदराबाद येथील एकूण ३५ ठिकाणी छापा टाकला. यात विजयच्या घर, कार्यालय आणि रिसॉर्टवर तर, अभिनेत्री नयनतारा आणि समंथा यांच्या निवासस्थानांचा समावेश आहे. तसेच चित्रपटाचे निर्माते, क्रू मेंबर्स यांच्या घरावरही छापा टाकण्यात आल्याचे समजते.
दरम्यान, ‘पुली’ हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आतापर्यंत सर्वात खर्चिक चित्रपटांपैकी एक असून तब्बल १२० कोटी खर्चून चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करण्यात आले आहे. या चित्रपटात बॉलीवूड अभिनेत्री श्री देवीचीही भूमिका आहे.
संग्रहित लेख, दिनांक 30th Sep 2015 रोजी प्रकाशित
प्रदर्शनाआधी ‘पुली’मधील कलाकारांच्या घरांवर आयकर विभागाचा छापा
'पुली' हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आतापर्यंत सर्वात खर्चिक चित्रपटांपैकी एक आहे.
Written by मोरेश्वर येरमविश्वनाथ गरुड

First published on: 30-09-2015 at 17:52 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Income tax raids at homes of puli actor vijay and nayanthara