India’s Sargam Koushal Wins Mrs World 2022: भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. भारताच्या सरगम कौशलने ‘मिसेस वर्ल्ड २०२२’ ही स्पर्धा जिंकली आहे. शनिवारी संध्याकाळी वेस्टगेट लास वेगास रिसॉर्ट आणि कॅसिनो येथे झालेल्या समारंभात सरगम विजेती ठरली. तब्बल ६३ स्पर्धकांपैकी सरगमने हा खिताब पटकावला. अमेरिकेच्या मिसेस वर्ल्ड २०२१ शेलिन फोर्ड यांनी सरगमला विजेती घोषित करत मिसेस वर्ल्डच्या ताजने तिला सन्मानित केलं. या स्पर्धेत मिसेस पॉलिनेशिया फर्स्ट रनर अप ठरली, तर मिसेस कॅनडा सेकंड रनर अप ठरली.

सरगम कौशलने हा खिताब जिंकल्यानंतरचा आनंद शेअर केला. कौशलने एक व्हिडीओ शेअर केला आणि तब्बल २१ वर्षांनी हा खिताब जिंकल्यानंतर ती किती आनंदी आहे हे सांगितलं. “आम्हाला २१-२२ वर्षांनी ताज परत मिळाला आहे. मी खूप उत्साहित आहे. लव्ह यू इंडिया, लव्ह यू वर्ल्ड,” असं सरगम म्हणाली.

सरगम कौशल ही उच्चशिक्षित आहे. तिने इंग्रजी साहित्यात पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलंय. सरगमचे २०१८ मध्ये लग्न झाले होते. तिचे पती भारतीय नौदलात आहेत. तिने स्वतः विशाखापट्टणममध्ये शिक्षिका म्हणून काम केलं आहे. डॉ. अदिती गोवित्रीकर यांनी २००१ साली ‘मिसेस वर्ल्ड’चा खिताब जिंकला होता. दरम्यान, यंदाच्या मिसेस वर्ल्डमध्ये अदिती ज्युरी सदस्य म्हणून उपस्थित होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिसेस वर्ल्ड ही विवाहित महिलांसाठीची सौंदर्य स्पर्धा आहे. या स्पर्धेची सुरुवात १९८४ मध्ये झाली होती. सुरुवातीला या स्पर्धेला मिसेस वुमन ऑफ द वर्ल्ड असं नाव देण्यात आलं होतं. पण १९८८ पासून ही स्पर्धा मिसेस वर्ल्ड म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. या स्पर्धेच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत भारताने दोन वेळा हा खिताब जिंकला आहे.