श्रीदेवी यांच्या डोक्यावर मोठी जखम?

या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता

sri
श्रीदेवी

अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूचे गुढ आता आणखी वाढले असून त्याविषयीची आणखी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. ‘एशिया नेट न्यूज’चा हवाला देत ‘टाईम्स नाऊ’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार दुबईचा सार्वजनिक फिर्याद विभाग फॉरेन्सिक अहवालामुळे असंतुष्ट असून त्यांनी पुन्हा एकदा सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्याची मागणी केल्याचे कळत आहे.

‘एशिया नेट न्यूज’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार श्रीदेवी यांच्या डोक्यावर मोठी जखम आढळली आहे. दुबई पोलिसांकडून याविषयीची कोणतीच अधिकृत माहिती दिलेली नाही. दरम्यान आता ही जखम नेमकी कधी आणि कशी झाली हाच प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. शवविच्छेदनादरम्यान ही जखम झाली का, की त्याआधीपासूनच ही जखम होती, बाथटबमध्ये पडण्याआधीच ही जखम झाली होती की बाथटबमध्ये पडल्यामुळे ही जखम झाली असे तर्क सध्या लावण्यात येत आहेत.

वाचा : बोनी कपूर यांच्या दोन्ही पत्नींच्या मृत्यूबद्दलचा दुर्दैवी योगायोग

श्रीदेवी यांच्या मृत्यूविषयीच्या या सर्व चर्चा पाहता आता सर्वांचेच लक्ष अंतिम अहवालाकडे लागून राहिले आहे. दरम्यान, एका प्रसिद्ध संकेतस्थळाने श्रीदेवींच्या डोक्यावर जखम आढळल्याचे वृत्त प्रसिद्ध केल्यामुळे आता बऱ्याच चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, श्रीदेवी यांचे पार्थिव लवकरच त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात येणार असून निधनानंतरच्या कायदेशीर कारवाया पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. तेव्हा आज रात्रीपर्यंत श्रीदेवी यांचे पार्थिव भारतात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Injury marks found on actress sridevi head says tv reports