बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी सध्या तिच्या टॉपलेस फोटोंमुळे जोरदार चर्चेत आहे. या फोटोंसाठी काहींनी तिचे कौतुक केले तर काहींनी सोशल मीडियाव्दारे तिची खिल्ली देखील उडवली. परंतु आता या फोटोंवरुन एक नवीनच वाद उद्भवला आहे. एका आंतराष्ट्रीय फोटोग्राफरने हे फोटो त्याने काढलेल्या फोटोंची नक्कल असल्याचा आरोप केला आहे.

कियारा अडणीचे हे फोटो सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रत्नानी याने काढले होते. त्याने आपल्या ‘सेलिब्रिटी कॅलेंडर’साठी कियाराचे हे टॉपलेस फोटोशूट केले होते. परंतु मेरी बार्श नामक एका आंतराष्ट्रीय फोटोग्राफरने त्याच्या फोटोंची ही नक्कल असल्याचा आरोप डब्बू रत्नानीवर केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेरी बार्शने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याने काढलेला फोटो देखील पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये वापरलेली संकल्पना अगदी डब्बू रत्नानीच्या फोटो सारखीच आहे. कियारा प्रमाणेच या फोटोमधील मॉडेलने आपले शरीर पानांमागे झाकले आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तसेच नेटकऱ्यांनी मेरी बार्श आणि डब्बू रत्नानी या दोघांच्याही फोटोंची तुलना करण्यास सुरुवात केली आहे.