सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर कलाविश्वातील घराणेशाही हा मुद्दा जोर धरु लागला आहे. अभिनेत्री कंगना रणौतने सुशांतची आत्महत्या नसून ती हत्याच आहे, असं म्हणत बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या मुद्द्यावर भाष्य केलं. तिच्या या वक्तव्यानंतर आता कलाविश्वापासून ते सामान्य नागरिकांपर्यंत प्रत्येकामध्ये हा विषय जोर धरु लागला आहे. त्यात आता दिवंगत अभिनेता इरफान खान याचा मुलगा बाबिलने इन्स्टावर पोस्ट शेअर करत सुशांतच्या नावाचा वापर करु नका, असं म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुशांतने बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे. मात्र या सगळ्यात बाबिलने ‘घराणेशाहीला विरोध करा पण त्यामागे सुशांतचं कारण देऊ नका’, असं म्हटलं आहे. त्याने इन्स्टावर वडील इरफान खान आणि सुशांत सिंह राजपूत या दोघांचे फोटो शेअर केले आहेत.

“आपण दोन महत्त्वाच्या व्यक्तींना गमावलं आहे. सुशांतचं असं अचानक जाणं हे कोणत्याही धक्क्याशिवाय कमी नाही. पण माझी सगळ्यांना एक नम्र विनंती आहे. या दु:खद घटनेसाठी कोणालाही दोषी ठरवू नका. या मागचं कारण शोधणं बंद करा, कारण त्यामुळे प्रत्येकालाच त्रास होत आहे, आणि सत्य उघड करण्यासाठी सुशांतच्या नावाचा वापर करु नका. तुम्हाला घराणेशाहीला विरोध करायचा असल्यास तो नक्कीच करा, पण त्यासाठी सुशांतला माध्यम म्हणून वापरु नका, असं बाबिल म्हणाला.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. वयाच्या ३४ व्या वर्षी जगाचा निरोप घेणाऱ्या या अभिनेत्याच्या मृत्युनंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Irrfan khan son babil khan talks about nepotism in film industry after sushant singh rajput death ssj
First published on: 24-06-2020 at 13:04 IST