अभिनेता इरफान खान न्युरोएन्डोक्राइन ट्यूमर या दुर्धर आजारावर लंडनमध्ये उपचार घेत आहे. तो लवकरच बरा व्हावा यासाठी त्याचे लाखो चाहते आणि बी-टाऊनमधले सेलिब्रिटीसुद्धा प्रार्थना करत आहेत. अशातच शाहरुख खानने त्याच्यासाठी मदतीचा हात पुढे केल्याची सर्वत्र चर्चा होत आहे. इरफान उपचारासाठी लंडनला रवाना होण्यापूर्वी शाहरुखने त्याची भेट घेतली आणि या भेटीदरम्यान त्याच्या लंडनमधील घराच्या चाव्याही इरफानच्या स्वाधीन केल्या असं म्हटलं जात होतं. मात्र या बातम्यांमध्ये काहीच तथ्य नसल्याचं समोर आलं आहे. इरफानच्या प्रवक्त्यांनीच याबाबत खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शाहरुख आणि इरफानच्या भेटीच्या चर्चा खोट्या असल्याचं इरफानच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं आहे. कोणातरी एका व्यक्तीच्या डोक्यातील ही कल्पना अविश्वसनीय सूत्रांद्वारे व्हायरल झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे या बातम्यांमध्ये काहीच तथ्य नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

उपचारासाठी लंडनला रवाना होण्यापूर्वी इरफानला शाहरुखची भेटण्याची इच्छा होती. यामुळे इरफानची पत्नी सुतापाने शाहरुखला फोन करुन त्यांच्या घरी येण्याची विनंती केली होती. या विनंतीचा मान राखत शाहरुखही इरफानला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेला. या भेटीदरम्यान शाहरुख आणि इरफानने दोन तास चर्चा केल्यानंतर त्याने त्याच्या लंडनमधील घराच्या चाव्याही इरफानच्या स्वाधीन केल्या, अशी बातमी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Irrfan khan spokesperson denies receiving any kind of help from shah rukh khan in london
First published on: 27-06-2018 at 11:34 IST