काही दिवसांपूर्वी अभिनेता अभिजीत खांडकेकरने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत अभिनेत्री नेहा पेंडसेला शुभेच्छा दिल्या होत्या. या शुभेच्छा कशाबद्दल होत्या हे मात्र स्पष्ट केले नव्हते. आता नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे त्यामुळे तिचा साखरपुडा झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

एका व्यक्तीसोबत नेहाने रोमॅण्टिक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमधील नेहासोबत असलेला व्यक्ती कोण आहे हे मात्र अद्याप समजू शकले नाही. पण नेहाने अंगठी घातल्याची पाहायला मिळत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने हृदयाचा इमोजी टाकला आहे. त्यामुळे नेहाने या व्यक्तीसोबत साखरपुडा केल्याचं म्हटलं जात आहे. इटलीतील मिलान कॅथेड्रल चर्चबाहेर हा फोटो काढलेला आहे.

https://www.instagram.com/p/B1IjVt5DevL/

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी वाचा : आरोहने सांगितला ‘रेगे’च्या शूटिंगदरम्यानचा भन्नाट किस्सा

हा फोटो पाहून नेहावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नेहाची खास मैत्रीण श्रृती मराठे हिने देखील ‘ओह माय गॉड’ अशी कमेंट केली आहे. तू खरंच साखरपुडा केला आहेस का असा प्रश्न अनेकांनी या फोटोवर विचारला आहे. आता यावर नेहा काय उत्तर देते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.