छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणजे ‘बिग बॉस.’ आता लवकरच ‘बिग बॉस १४’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण बॉलिवूडचा भाईजाना सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या या रिअॅलिटी शोमध्ये कोणते कलाकार सहभागी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता भोजपूरी अभिनेत्री बिग बॉस १४मध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
बिग बॉस १४साठी निर्मात्यांनी भोजपूरी अभिनेत्री आम्रपाली दुबेला विचारण्यात आले असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पण निर्माते किंवा अभिनेत्री यांच्याकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
आणखी वाचा : ‘बिग बॉस १४’साठी सलमान घेणार इतके मानधन?
यंदाच्या बिग बॉस १४ची थीम काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच शोमध्ये निया शर्मा, विवियन डिसेना, सुगंधा मिश्रा, अविनाश मुखर्जी, शिरीन मिर्जा, सौम्या टंडन हे कलाकार दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तसेच बिग बॉस १४मध्ये स्पर्धकांनी एण्ट्री करण्यापूर्वी करोना चाचणी करण्यात येणार आहे.