बॉलिवूड अभिनेत्री गौहर खान सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. या चर्चा ती संगीत दिग्दर्शक इस्माइल दरबार यांचा मुलगा झैद दरबारला डेट करत असल्यामुळे सुरु झाल्या होत्या. आता गौहरचा साखरपुडा झाला असल्याचे म्हटले जात आहे.

नुकताच गौहरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती झैद दरबारसोबत दिसत आहे. तिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे तर झैदने पिवळ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. या फोटोमध्ये ते दोघे एकमेकांकडे बघत असल्याचे दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

@zaid_darbar

A post shared by GAUAHAR KHAN (@gauaharkhan) on

हा फोटो शेअर करत गौहर खानने अंगठीचा इमोजी वापरला आहे. त्यामुळे गौहरचा साखरपूडा झाला असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तसेच तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिचे अभिनंदन केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान गौहर आणि झैद २५ डिसेंबरला लग्न बंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे. लग्नाच्या दोन दिवस आधी सर्व विधी करण्यात येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तसेच या लग्नसोहळ्यासाठी काही मोजक्याच लोकांना बोलवण्यात येणार असल्याचे म्हटले जाते.

कोण आहे झैद?
‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’ यांसारख्या चित्रपटांना दमदार संगीत देणारे इस्माइल दरबार यांचा मुलगा झैद हा डान्सर आहे. सोशल मीडियावर झैदचे अनेक फॉलोअर्स असून तो आधी टिकटॉक स्टार होता. झैद आणि गौहर यांच्या वयात १२ वर्षांचं अंतर आहे.