निक्की तंबोळीसाठी बिग बॉसमध्ये होणार पुन्हा जानची एण्ट्री?

जाणून घ्या सविस्तर

सध्या छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो ‘बिग बॉस १४’ चर्चेत आहे. या शोमध्ये आतापर्यंत काही कलाकारांची एण्ट्री झाली आणि काही कलाकारांनी एक्झिट देखील घेतली. पण सर्वात जास्त कोणाच्या चर्चा रंगल्या असतील तर त्या कुमार सानू यांचा मुलगा जानच्या. जान आणि बिग बॉस स्पर्धक निक्की तंबोळी यांची केमिस्ट्री चाहत्यांना विशेष आवडत होती. पण शोमधून जानला बाहेर पडावे लागले. पण आता जानची पुन्हा शोमध्ये एण्ट्री होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, जान कुमार सानूची बिग बॉसच्या घरात पुन्हा एण्ट्री होऊ शकते. निक्की तंबोळीला पाठिंबा देण्यासाठी जान बिग बॉसच्या घरात जाणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच रुबीनाची बहिण ज्योतिका, राहुल महाजन आणि जॅस्मीन भसीनची देखील घरात एण्ट्री होण्याची शक्यता आहे. ३० जानेवारीपासून हे सर्व कलाकार क्वारंटाइनमध्ये आहेत. पण जानची पुन्हा घरात एण्ट्री होणार असल्याचे ऐकून चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jaan Kumar Sanu (@jaan.kumar.sanu)

नोराचा सेक्सी डान्सपाहून आईने फेकून मारली चप्पल, व्हिडीओ पुन्हा चर्चेत

बिग बॉसच्या घरात सुरुवातील जान आणि निक्की तंबोळीची जोडी पाहायला प्रेक्षकांना प्रचंड आवडत होती. पण निक्कीने ती असा कोणताही विचार करत नाही असे म्हटले होते. ती जानला केवळ एक चांगला मित्र म्हणून पाहते असे निक्की म्हणाली होती. जान आणि निक्कीची मैत्री पाहायला प्रेक्षकांना प्रचंड आवडत होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Is jaan kumar sanu reenter bigg boss 14 as nikki tamboli connection avb