‘सिंघम’ चित्रपटातून अनेकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री म्हणजे काजल अग्रवाल. तिने २०२०मध्ये उद्योगपती गौतम किचलूशी लग्न केले. त्यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. आता काजल प्रेग्नंट असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या चर्चा काजलचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे सुरु झाल्या आहेत.
काजलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती तिच्या मैत्रीणीसोबत वेळ घालवताना दिसत आहे. तसेच तिने परिधान केलेल्या कपड्यांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. या फोटोवरुन ती प्रेग्नंट असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. काजल लवकरच गूड न्यूज देणार असे म्हटले जात आहे. पण याबाबत काजल किंवा तिचा पती गौतम यांच्याकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
आणखी वाचा : आर. माधवन भारत सोडणार? पत्नी, मुलासह दुबईत शिफ्ट होण्याचा निर्णय

सध्या काजल स्वत:ला वेळ देत असल्याचे देखील म्हटले जात आहे. तिने ऑफिशिअल कमिटमेंट पूर्ण केल्या असून ती स्वत:ला वेळ देत आहे. ३० ऑक्टोबर २०२० रोजी काजल आणि गौतम यांनी लग्न केले. मोठ्या थाटामाटात त्यांचा विवाहसोहळा पार पडला. काही कलाकरांनी देखील त्यांच्या लग्नाला हजेरी लावली होती. काजल आणि गौतम जवळपास ७ वर्षे एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. ती पतीसोबतचे फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करताना दिसते. आता ती प्रेग्नंट असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.